शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत महायुतीच्या उमेदवारांना ‘मोर्शी पॅटर्न’ची भीती; अर्ज माघारीकडे लक्ष

By गणेश वासनिक | Updated: November 3, 2024 15:50 IST

उमेदवारी अर्ज मागे घेण्यास केवळ एक दिवस हाती आहे.

गणेश वासनिक / अमरावती, मैदान कोण साेडणार याकडे लागल्या नजरा, बंडखोरांना नेत्यांचीच फूस असल्याच्या चर्चांना उधाणअमरावती: २० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील आठ मतदार संघात महाविकास आघाडीविरूद्ध महायुती उमेदवारांमध्ये लढतीचे चित्र आहे. मात्र मोर्शी मतदार संघात भाजप आणि अजित पवार गटाचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले असून येथे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. त्यामुळे महायुतीत ‘मोर्शी पॅटर्न’अन्य मतदार संघात डोकेदुखी ठरणारा आहे. तिकीट न मिळाल्याने अनेकांनी बंडखोरी करत नामांकन दाखल केले आहे. नामांकन अर्ज मागे घेण्यास केवळ एक दिवस हाती आहे.

मोर्शी मतदार संघात महायुती धर्म पाळला नाही, असे म्हणत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विद्यमान आमदार देवेंद भुयार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपने अगोदरच उमेश उर्फ चंदू यावलकर यांना उमेदवारी जाहीर करून माळी समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. खरे तर महायुती तिकीट वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार सिटींग आमदारांना उमेदवारी देणे अनिवार्य होते. तथापि, भाजपने मोर्शीत महायुती धर्माचे पालन न केल्यामुळे अजित पवार गटाने ‘घड्याळ’वर आमदार भुयार यांना उभे केले आहे. त्यामुळे निकाल जो काही येईल, ते पुढे बघू या असे अजित पवार गटाने शड्डू ठोकला आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत ‘मोर्शी पॅटर्न’हा अमरावती जिल्ह्यात ईतर बंडखोरांना सॉफ्ट काॅर्नर ठरत आहे. मोर्शीत मैत्रीपूर्ण लढत तर आमच्याही मतदार संघात मैत्रीपूर्णच होऊ द्या ना? असे म्हणत अपक्ष बंडखाेरांनी उमेदवारी मागे न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे सोमवारी निवडणूक रिंगणातून काेण माघार घेतात, त्यानंतर त्या-त्या मतदार संघाचे चित्र स्पष्ट होणार आहे. बंडखाेर उमेदवारांची डोकेदुखी महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन्हीकडे दिसून येत आहे. ‘अभी नहीं तो कभी नहीं’... ही तर नेत्यांची फूस नाही ना?अमरावतीत माजी राज्यमंत्री जगदिश गुप्ता हे भाजपचे आहे. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मी भाजपचा बंडखोर उमेदवार असून रिंगणात कायम असेल, अशी गुप्ता यांची भूमिका आहे. बडनेरातून प्रीती बंड यांनी उमेदवारी दाखल केली आहे. मातोश्रीच्या सन्मानासाठी ही निवडणूक लढवित असल्याचे त्या ठामपणे सांगत आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोदसिंह गड्रेल यांनी अचलपुरातून उमेदवारी दाखल केली असून पक्षाने अन्याय केल्याची त्यांची भावना आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख यांनी तिवस्यातून नामांकन अर्ज दाखल केला असून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, हे विशेष. भाजपचे प्रभूदास भिलावेकर, ज्योती सोळंके-मालवे, शिंदेसेनेच्या सविता आहाके यांनी नामांकन दाखल केले आहे. दर्यापूरातून काँग्रेसचे गुणवंत देवपारे, रामेश्वर अभ्यंकर, तर भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांनी युवा स्वाभिमान पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोर्शीतून शरद पवार गटाचे डॉ. मनाेहर आंडे यांनीही नामांकन अर्ज दाखल केला आहे. एकंदरीत बंडखोरांची रिंगणातील उमेदवारी ‘अभी नहीं तो कभी नहीं’ याच धर्तीवर कायम असल्याचे दिसून येते. काही बंडखाेरांना पक्षातील नेत्यांचीच फूस असल्याची आता चर्चा होत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती