शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

डास वाढल्याने डेंग्यूची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:06 IST

शहरात डांसाचा उच्छाद वाढल्याने पुन्हा जीवघेण्या डेंग्यूची भीती निर्माण झालेली आहे. डासाच्या त्रासामुळे अमरावतीकरांची झोप उडाली आहे. दिनचर्येची कामे सोडून डासांचा बंदोबस्त करण्यात अनेकांना वेळ गमावावा लागत आहे.

ठळक मुद्देउडाल्या झोपा : ठोस उपाययोजनेत महापालिका प्रशासन फेल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात डांसाचा उच्छाद वाढल्याने पुन्हा जीवघेण्या डेंग्यूची भीती निर्माण झालेली आहे. डासाच्या त्रासामुळे अमरावतीकरांची झोप उडाली आहे. दिनचर्येची कामे सोडून डासांचा बंदोबस्त करण्यात अनेकांना वेळ गमावावा लागत आहे.गेल्या वर्षात डेंग्युच्या प्रकोपाने अमरावतीकर हैराण झाले होते. डेंग्युमुळे अनेकांचा गेला, तर दीडशेवर नागरिकांना रुग्णालयात उपचार घ्यावा लागला. चांगल्या पाण्यात उत्पत्ती होणारी ही डेंग्यू डासाची प्रजात यंदाच्या उन्हाळ्यात पुन्हा तोंड वर काढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावली आहे. आता उन्हाळ्यातील दिवसांमध्ये कुलरचा वापर वाढल्यामुळे डासांचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे डेंग्यूचा उच्छाद वाढण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. मात्र, अद्यापपर्यंत महापालिकेकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे स्वच्छतेकडे दुर्लक्ष तर दुसरीकडे जनजागृतीचा अभाव असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सायंकाळनंतर घर असो की कार्यालये कुठेही बसणे अवघड झाले आहे. कार्यालयीन कामकाजात डासांचा सर्वाधिक अडसर निर्माण झाला असून, डांसाचा बंदोबस्त लावण्यातच अर्धाअधिक वेळ द्यावा लागत आहे. यावर उपाय म्हणून परिसर स्वच्छ व धूर फवारणी करणे गरजेचे असल्याचे काहींचे मत आहे.या परिसरात डासाचा उच्छादशहरातील बहुतांश परिसरात डासांचा उच्छाद वाढल्याची स्थिती आहे. मोर्शी रोडवरील जिल्हा स्टेडियम परिसर, प्रशांतनगर, नवाथेनगर, अंबाविहार, सातुर्णा, कॅम्प परिसर, महेंद्र कॉलनी याशिवाय अनेक परिसरात डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.स्वच्छतेकडे दुर्लक्षसांडपाण्याच्या नाल्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यातच घराघरांत लागलेल्या कुलरमुळे डासांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनासह नागरिकांनी नाल्यांच्या व कुलरमधील पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावणे अनिवार्य झाले आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य