शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

‘एफडीए’कडून अल्प मनुष्यबळाचे रडगाणे !

By admin | Updated: July 25, 2016 00:21 IST

एफडीए अर्थात अन्न व औषधी विभागाच्या नाकावर टिच्चून महसूल यंत्रणा गुटखा बंदीच्या कारवाईमधून कोटींचे उड्डाणे घेत आहे.

महसूल, पोलीस विभाग : सव्वा कोटींचा गुटखा जप्त अमरावती : एफडीए अर्थात अन्न व औषधी विभागाच्या नाकावर टिच्चून महसूल यंत्रणा गुटखा बंदीच्या कारवाईमधून कोटींचे उड्डाणे घेत आहे. मागील महिन्याभरात महसूलने शहरातून सुमारे १ ते सव्वा कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला असताना एफडीए मात्र अल्प मनुष्यबळाचे रडगाणे गात सुटला आहे. महसूल विभागाने एफडीएच्या कार्यतत्परतेवर ओढलेले ताशेरे व धडक कारवाईने ‘एफडीए’ची अवस्था अतिशय ‘लाचार’ अशी झाली आहे. महसूलने दिलेले आव्हान न स्वीकारता त्यांचेशी आता एफडीएने असहकाराची भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात सर्वदूर कानाकोपऱ्यात गुटखा पुडींची राजरोस विक्री आणि साठा होत असताना एफडीए अधिकारी निगरगट्ट झाले आहेत. तहसीलदारांसारख्या स्वत:पेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्यांनी ओढलेले ताशेरे स्थानिक एफडीआयचे अधिकार मोठ्या दिलाने पचवतात. तरीही ज्या बाबींसाठी ते वेतन घेतात. त्याच बंदीच्या अंमलबजावणीसाठी एफडीए प्रति आव्हान देण्याच्या मानसिकतेतच उरलेली नाही. तुमच्या नाकावर टिच्चून महसूल कारवाई करतो, तुम्ही का मागे सरता, असा प्रश्न स्थानिक एफडीएच्या अधिकाऱ्यांना विचारला असता त्यांनी अल्प मनुष्यबळाची ढाल समोर केली आहे. आमच्याकडे पाच जिल्ह्यांचा कारभार असल्याने तुलनेत अत्यल्प अधिकारी-कर्मचारी आहेत आणि त्यामुळेच कारवाईला मर्यादा येतात, असेही एफडीएच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. गुटख्याची तस्करी कुठू होते? तो नेमका कुठे साठवला जातो आणि शहरासह ग्रामीण भागात त्याचा पुरवठा कसा होतो, या माहिती विभागाला आहे. मात्र कारवाईचे धाडस दाखवीत नाहीत. (प्रतिनिधी)अन्न सुरक्षा मानके अधिनियम कागदावरचगुटखाबंदीची ऐसीतैसी झाली. प्रशासनाने अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ धाब्यावर बसविला आहे. कारवाई व दंडाचे प्रावधान आहे. मात्र गुटखा जप्त करण्याशिवाय अन्य कारवाई मागील ४ वर्षांपासून कागदोपत्रीच आहे. ज्यांच्याकडे गुटखा साठा आढळला, त्यांच्या कारवाईबद्दल ‘एफडीए’ अनभिज्ञ आहे.तोंडदेखली कारवाईकारवाईचे लक्ष गाठण्यासाठी अमूक एवढा किंमतीचा गुटखा जप्त केला. याच्या बातम्यांसाठी आग्रह धरला जातो. मात्र वरवर कार्यवाही केल्याने त्याचा सुगावा लागणे तर शक्य नाही ना! आरोग्यास बाधा आणणाऱ्या पदार्थावर बंदी आणण्यामागे हेतू चांगला असतो. मात्र पुढे काहीच होत नसल्याने ही कारवाई कागदोपत्री दाखविण्यात येत आहे.