शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सासऱ्याची सुनेवर वाईट नजर, पतीचीही धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:14 IST

अमरावती : सासऱ्याने सुनेवरच वाईट नजर ठेवल्याची बाब महिलेने पती व सासूला सांगितली. मात्र, या गंभीर प्रकारला पती व ...

अमरावती : सासऱ्याने सुनेवरच वाईट नजर ठेवल्याची बाब महिलेने पती व सासूला सांगितली. मात्र, या गंभीर प्रकारला पती व सासूने विरोध न करता उलट घरातील गोष्ट घरातच ठेव, अन्यथा जीवाने मारून टाकेन, असे म्हटल्याची धक्कादायक घटना चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव येथे घडली. याप्रकरणी सासरच्या मंडळीविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना २० फेब्रुवारी २०२० पूर्वी घडली.

पोलीससूत्रानुसार, निर्भयसिंग केदारसिंग रघुवंशी (३३, पती), केदारसिंह राजारामसिंह रघुवंशी (५५ सासरे), दोन महिला, अतुलसिंग राजारामसिंह रघुवंशी (४२, सर्व रा. लोहान महाजनवाडी राजापेठ) रघुवंशी प्लॉट अमरावती), चंद्रकांत रतेशसिंग रघुवंशी (४३, रा. येवदा ता. दर्यापूर) अशी आरोपींची नावे आहेत. यातील २४ वर्षीय तक्रारदार महिलेचे निर्भयसिंगसोबत ४ फेब्रुवारी २०२० रोजी लग्न झाले. १५ दिवस सदर महिलेला चांगले नांदवले. मात्र, हुंडा दिला नाही म्हणून सासरच्या मंडळींनी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ चालविला. दोन लाख रुपये माहेरहून आणण्याचा तगादा लावून महिलेला मारहाण करण्यात आली. यातील आरोपी सासरा हा वाईट नजरेने बघत असल्याची तक्रार तिने पती व सासूकडे केली. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत घरातील गोष्ट घरातच ठेव, अन्यथा जीवाने मारून टाकेन, अशी धमकी दोघांनही विवाहितेला दिली. त्यानंतर तिने हा प्रकार माहेरच्या लोकांना सांगितला. नंतर सदर प्रकरण पूर्वी महिला सेलकडे गेले. तेथे समेट घडून न आल्याने अखेर पोलिसांनी भादंविचे कलम ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास पीएसआय मनीषा सामटकर करीत आहेत.