शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लघुशंकेचे निमित्त करून बापानेच केली मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 05:00 IST

पोलीस सूत्रांनुसार, पांढरघाटी शेतशिवारात पाचपोहर यांचे दोन एकर शेत आहे.  आरोपी दिलीपला दोन पत्नी आहेत. एक माहेरी मांगरूळी पेठ येथे मुलगा दिनेशसह वास्तव्यास होती, तर तो स्वत: दुसऱ्या बायकोसोबत खडका येथे वास्तव्यास आहे. पहिल्या पत्नीचे खावटी आणि शेतजमिनीचे  प्रकरण न्यायालयात सुरू होते. यादरम्यान शेतजमिनीच्या वादातून जन्मदात्याने मुलाला संपविण्याचा कट रचला. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी दिनेशला दिलीपने शेतात बोलावले आणि कुऱ्हाडीने त्याच्या मानेवर सपासप वार करून रक्तबंबाळ केले. 

ठळक मुद्देबारगाव शिवारातील घटना, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आखला कट

  लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा शहीद : लगतच्या पांढरघाटी शिवारात दिनेश दिलीप पाचपोहर (२८ रा. पेठ मांगरूळी) याच्यावर बापानेच शेतीच्या वादातून प्राणघातक हल्ला केल्याचे पोलीस तपासात पुढे आले. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली होती. दोन दिवसांच्या उपचारानंतरही मुलाचे प्राण वाचले नाहीत. बेनोडा पोलिसांनी याप्रकरणी दिलीप भाऊराव पाचपोहर (५५, रा. खडका) या पित्याला अटक केली. पोलीस सूत्रांनुसार, पांढरघाटी शेतशिवारात पाचपोहर यांचे दोन एकर शेत आहे.  आरोपी दिलीपला दोन पत्नी आहेत. एक माहेरी मांगरूळी पेठ येथे मुलगा दिनेशसह वास्तव्यास होती, तर तो स्वत: दुसऱ्या बायकोसोबत खडका येथे वास्तव्यास आहे. पहिल्या पत्नीचे खावटी आणि शेतजमिनीचे  प्रकरण न्यायालयात सुरू होते. यादरम्यान शेतजमिनीच्या वादातून जन्मदात्याने मुलाला संपविण्याचा कट रचला. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी दिनेशला दिलीपने शेतात बोलावले आणि कुऱ्हाडीने त्याच्या मानेवर सपासप वार करून रक्तबंबाळ केले. यावेळी जखमीला तातडीने वरूडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने नागपूरला हलविण्यात आले  होते. मात्र, दोन दिवसांनंतर २६ नोव्हेंबर रोजी जखमी मुलाचा मृत्यू झाला. बेनोडा पोलिसांनी भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला वरूड न्यायालयात हजर केले असता, त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप श्रीरावसह बेनोडा पोलीस करीत आहेत.

सहा महिन्यांचा असताना वडिलांपासून विभक्त  आरोपी दिलीप हा दिनेश अगदी सहा महिन्याचा असताना पहिल्या पत्नीला सोडून गेला. दुसरे लग्न करून खडका येथे पत्नी व मुलाबाळांसह वास्तव्यास होता. पहिल्या पत्नीने न्यायालयात खावटीचे प्रकरण दाखल करून शेतजमिनीचा हक्क मिळावा, यासाठी कायदेशीर लढाई सुरु होती. यामध्ये न्यायालयाने शेतजमिनीचा ताबा पहिल्या पत्नीला दिला. ती शेती दिनेश आणि त्याची आई वाहत होते.  हा राग मनात असल्याने अखेर शेतजमिनीच्या वादातून आरोपी पित्याने मुलाला संपविण्याचा कट रचला. 

कोयत्याने मानेवर वार, दुचाकीवर मागितली ‘लिफ्ट’पेरणी केलेल्या गव्हाला पाणी देऊन गावी परतत असताना आरोपी बापाने मुलास बेनोड्यापर्यंत सोडून देण्याची विनंती केली. पांढरघाटीपासूनच तो हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. शेवटी बारगावजवळ ऐन राष्ट्रीय महामार्गावर लघुशंका आल्याची बतावणी करून त्याने मुलास दुचाकी थांबवायला लावली. षडयंत्रापासून अनभिज्ञ मुलगा दुचाकी  रस्त्याच्या कडेला घेऊन स्टँडवर लावण्यासाठी झुकताच त्याच्या मानेवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या मुलावर शर्थीचे उपचार करण्यात आले. 

टॅग्स :Murderखून