शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशी कट्टा दाखवून पिता-पुत्राला लुबाडले, २५ किलो चांदी लुटली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 11:08 IST

जवाहरनगरात सराफावर सशस्त्र दरोडा : सोने, रोख रक्कम बचावली

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कार व दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आठ आरोपींनी सुवर्णकार वडील व मुलाला मारहाण करून त्यांच्याजवळील २५ किलो चांदी असलेली बॅग हिसकावून पळ काढला. त्यांनी आरोपींचा प्रतिकार केला असता झटापटीदरम्यान सुवर्णकाराने सोने व रोकड असलेली बॅग परिसरातील एका घरात फेकल्याने तो ऐवज बचावला. या घटनेतील चार आरोपींकडे देशी कट्टे होते, असा दावा फिर्यादीने केला. याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी आठ अज्ञातांविरूद्ध सायंकाळी ५.२५ वाजता सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल केला.

बुधवारी सकाळी ११:२५ वाजताच्या सुमारास जवाहरनगर येथील मातामाय मंदिराजवळ ही घटना घडली. घटनेचे गांभीर्य ओळखून उच्च पदस्थ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. दरोडेखोरांनी लुटलेल्या चांदीचे बाजारमूल्य सुमारे २० लाखांच्या घरात आहे. जवाहरनगर येथील रहिवासी अरविंद उत्तमराव जावरे (४८) यांचे नवसारी ते व्हीएमव्ही मार्गावर सराफा दुकान आहे. बुधवारी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास अरविंद हे वडील उत्तमराव जावरे (७५) यांच्यासह दुचाकीने दुकानात जात होते. त्यांच्याकडील एका बॅगमध्ये सोने व रोख रक्कम, तर दुसऱ्या बॅगमध्ये चांदी होती. जावरे पिता-पुत्र घरापासून काही अंतरावर पोहोचताच एका मंदिराजवळ एका लुटारूने अचानक अरविंद यांच्या दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे ते दोघेही पडले. त्याचवेळी दुसऱ्या एका तरूणाने २५ किलो चांदीचे दागिणे असलेली बॅग दुचाकीवरून उचलली. 

यावेळी त्यांच्यात चांगलीच झटापट झाली. ती बॅग त्या आरोपीने जवळच्या चारचाकीतील इसमाकडे दिली. त्याचवेळी तिसऱ्या आरोपीने त्यांच्याकडील सोने व रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. अन्य तीन मुलांनी जावरकर यांना मारहाण केली. मात्र, त्यांनी ती बॅग परिसरातील एका नागरिकाच्या घरात फेकली. चारपैकी एकाने आपल्या नाकावर देशीकट्टयाने मुठीकडून मारले. त्यामुळे आपले नाक फुटले. लगेच ज्या तीन मुलांच्या हाती देशी कट्टे होते ते व अन्य एक मुलगा असे चौघेही दुचाकीने पळाले, तर कारमध्ये देखील चौघे होते, असे अरविंद जावरे यांनी म्हटले आहे. 

व्हिडीओ बनविणाऱ्या महिलेला धमकावले!भरदिवसा झालेली लूटमारीची घटना या परिसरातील एक महिला आपल्या घराच्या वरच्या माळ्यावरून मोबाइलमध्ये कैद करीत होती. हा प्रकार आरोपींच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या महिलेला पिस्टलचा धाक दाखवून धमकावले. त्यामुळे घाबरलेली महिला जिवाच्या भीतीने घरात निघून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. 

प्रत्यक्षदर्शीनी दिली माहिती गाडगेनगरचे ठाणेदार प्रशांत माने यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. पोलिस उपायुक्त सागर पाटील, एसीपी शिवाजीराव बचाटे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक सीमा दाताळकर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. फॉरेन्सिकची चमू, ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. याप्रकरणी अरविंद जावरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आठ जणांविरुद्ध दरोडा व आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला.

आरोपींनी केली रेकी जवाहरनगरात शिरलेले आठ आरोपी सुवर्णकार अरविंद जावरे यांच्यावर पाळत ठेवून होते. ते बराच वेळ परिसरातील एका मंदिराजवळ फिरत होते. अरविंद व त्यांचे वडील उत्तमराव हे एकाच दुचाकीने परिसरातील मंदिराजवळ पोहोचताच आरोपींनी अचानक त्यांना लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर लुटारूंनी हाती आलेली चांदीची बॅग घेऊन तेथून पळ काढला, असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

टॅग्स :AmravatiअमरावतीRobberyचोरी