शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

गुरूदेव भक्तांचे जिल्हा कचेरीसमोर उपोषण

By admin | Updated: October 26, 2016 00:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेवर टीका करणाऱ्या पंढरपूर येथील निवृत्ती वक्ते याला तातडीने अटक करावी...

आंदोलन : निवृत्ती वक्ते यांना अटक करण्याची मागणीअमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेवर टीका करणाऱ्या पंढरपूर येथील निवृत्ती वक्ते याला तातडीने अटक करावी या मागणीसाठी २२ आॅक्टोबरपासून जिल्हाकचेरीसमोर राष्ट्रसंत मिशन, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.पंढरपूर येथील निवृत्ती वक्ते यांनी एक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर टीकात्मक भाष्य केले आहे. गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आमचा वैष्णव सांप्रदायाचा विरोध करीत होते. म्हणून त्यांचे अभंग कीर्तन आम्ही घेत नाही, असा आरोप वक्ते यांच्या पुस्तकात करण्यात आले आहे. हे सर्व खोटे आरोप लाखो भक्तांच्या भावना दुखावणारे आहेत. त्यामुळे सदर पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त करण्यात याव्यात आणि निवृत्ती वक्ते यांना अटक करावी, अशी मागणी उापेषणकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनात राष्ट्रीय मिशनचे अध्यक्ष किसन पारिसे, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे नरेंद्र कठाणे, नामदेव हेकडे, गोंडूजी पाटील महाराज, रामेश्र्वर मेहत्रे, किशोर महल्ले, विवेकानंद बेरडे, आकाश बावनकर, राहुल इंगोले, निखिल साव, मनोहर साबळे, जनार्दन नांदणे, महेश पारिसे आदींचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)