शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मनसेच्या कार्यकर्त्यांचे स्मशानभूमीत उपोषण

By admin | Updated: December 22, 2016 00:39 IST

तालुका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा दाखल न घेतल्याने तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ...

योजनांपासून बेदखल : मेळघाटात कर्मचारी बेपत्ता चिखलदरा : तालुका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा दाखल न घेतल्याने तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जामली येथे बुधवारपासून चक्क स्मशानभूमितच साखळी उपोषणाला सुरुवात केली. जामली (आट) गावात निराधार योजनेचा लाभ आदिवासींना न देता वंचित ठेवण्यात आले आहे. पंचायत समिती विशेष घटक योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या साहित्य वाटपाची यादी ग्रापं. कार्यालयात लावण्यात यावी, कृषीसेवकाने आठवड्यातून एक दिवस उपस्थित राहून आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी, मग्रारोहयो अंतर्गत जॉबकार्डधारकांना रोजगार हमी योजनेची कामे द्यावीत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात औषधीसाठा उपलब्ध करून देण्यात यावा, आदिवासी विभागामार्फत कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यात यावी, ग्रामसेवक, पटवारी, शिक्षक सतत बेपत्ता राहात असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, इंटरनेट सुविधा, मोबाईल टॉवर उभारण्यात यावे, विद्युत रिडिंग न घेता देयके काढणे बंद करावे, आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी तसेच धारणी व चिखलदरा येथील तहसीलदारांना वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र, त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. परिणामी मनसेचे मणिराम दहिकर, प्रवीण बेलसरे, रामकिसन सेलुकर, दीपक भुसूम, गौतम देवगे, प्यारेलाल दहीकर, रामलाल कास्देकर, अरविंद दहीकर, रायबाबू दहीकर, श्रीराम दहीकर, नंदलाल बेलसरे, किरण सावरकर, सूर्या तोटे आदींनी बुधवारपासून जामली येथील स्मशानभूमित उपोषण सुरू केले आहे. मनेसेचे प्रियेश अवघड व अंकुश इंगळे यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या उपोषणाची प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. आदिवासींच्या हितार्थ सुरू करण्यात आलेल्या या उपोषणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे. परिसरात संताप आदिवासींपर्यंत योजनांचा लाभ पोहोचत नाही. अधिकारी, कर्मचारी बेपत्ता राहतात. प्रशासनाला निवेदन देऊन दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.