शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

शेतकऱ्यांना साडेतीन कोटींची पीक भरपाई

By admin | Updated: September 27, 2014 23:07 IST

राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत सन २०१३-१४ हंगामाकरिता ६८ हजार ४९ शेतकऱ्यांनी २ कोटी ५२ लाख २६ हजार रूपयांचा विमा हप्ता भरला. जिल्ह्यात मागील वर्षी ओला दुष्काळ, अवकाळी पाऊस

अमरावती : राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत सन २०१३-१४ हंगामाकरिता ६८ हजार ४९ शेतकऱ्यांनी २ कोटी ५२ लाख २६ हजार रूपयांचा विमा हप्ता भरला. जिल्ह्यात मागील वर्षी ओला दुष्काळ, अवकाळी पाऊस व गारपीटमुळे सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांवर घट आली असताना केवळ ११ टक्के शेतकऱ्यांना विम्याचे कवच लाभले. उर्वरित शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. अपुरा पाऊस, पावसातील खंड व अती पाऊस या तीन हवामान घटकाच्या धोक्यापासून संरक्षण देणारी पीक विमा योजना ही राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन, मूग, उडीद पिकांचा समावेश आहे. बिगर कर्जदारांना ऐच्छीक असणारी ही योजना मात्र कर्जदार शेतकरी सभासदांना सक्तीची होती. यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामधून विमा हप्त्यापोटी रक्कम वळती करण्यात आली. बहुतांश शेतकरी पीककर्ज घेतात. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांचा विमा परस्पर काढला गेला. मागील वर्षी ओला दुष्काळसदृश स्थिती होती. यामुळे शेती पिकांचे ५० टक्क्यांवर नुकसान झाले. प्रत्यक्षात नुकसान भरपाई ही एकूण विमा धारकांच्या केवळ ११ टक्के प्रमाणात शेतकऱ्यांनाच मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. अमरावती उपविभागांतर्गत अमरावती, भातकुली, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव (खंडेश्वर) तालुक्यात ३२ हजार ९४२ शेतकऱ्यांनी विमा हप्त्यात भरणा केला. यापैकी ४९२ शेतकऱ्यांना ९ लाख ४८ हजार ७१० रूपयांचा लाभ मिळाला आहे. मोर्शी उपविभागांतर्गत वरूड, मोर्शी, तिवसा, चांदूरबाजार तालुक्यातील २० हजार २१० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. प्रत्यक्षात २ हजार २७ शेतकऱ्यांना ८२ लाख ५९ हजार ५८७ रूपयांचा पीक विम्याचा लाभ मिळाला. अचलपूर उपविभागांतर्गत अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, धारणी, चिखलदरा तालुक्यातील १४ हजार ८९७ शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला. प्रत्यक्षात ५ हजार १९७ शेतकऱ्यांना २ कोटी ५३ लाख ६५ हजार ६८९ रूपयांचा लाभ मिळाला आहे. उर्वरित ८९ टक्के शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. (प्रतिनिधी)