शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:10 IST

महाबीजचे सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे नैराश्यातून स्थानिक तालुका कृषी कार्यालयात ३० जुलैला दुपारी दीडच्या सुमारास एका शेतकºयाने विष प्राशनाचा प्रयत्न केला. तालुका कृषी अधिकारी, प्रहार कार्यकर्त्यांनी हा अनर्थ टाळला.

ठळक मुद्देबोगस बियाणे : कृषी अधिकारी, प्रहार कार्यकर्त्यांनी टाळला अनर्थ
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : महाबीजचे सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे नैराश्यातून स्थानिक तालुका कृषी कार्यालयात ३० जुलैला दुपारी दीडच्या सुमारास एका शेतकऱ्याने विष प्राशनाचा प्रयत्न केला. तालुका कृषी अधिकारी, प्रहार कार्यकर्त्यांनी हा अनर्थ टाळला.युनूसखाँ महम्मदखाँ (४२, रा. तळेगाव मोहना) असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी दोन हेक्टर शेतात २८ जूनला सोयाबीनची पेरणी केली. परंतु, महाबीज कंपनीचे जे/एस ९३०५ बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे पेरणी व उत्पादन असे १ लाख ८० हजारांचे नुकसान झाले आहे.महाबीजच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी नुकसानभरपाई मिळणार नाही, दुसऱ्या पेरणीकरिता महाबीजकडून बियाणे मिळणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. सोमवारी तालुका कृषी कार्यालयात आपली व्यथा मांडताना युनूसखाँ यांनी थैलीतील बाटली काढून विष पिण्याचा प्रयत्न केला. यावेळी तालुका कृषी अधिकारी व प्रहार शेतकरी संघटनेचे मंगेश इंगोले, मनोज भुगूल, ऋषीकेश पोहोकार, अनुज भुजबळ, अनिकेत ठाकरे, भूषण चर्जन यांनी अप्रिय घटना टाळली.यापूर्वी २८ जुलैला युनूसखाँ यांनी शेतात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु, आजूबाजूच्या शेतातील शेतमजुरांनी हा प्रयत्न हाणून पाडला होता.शेतात १२ जुलैला पाहणी केली. सोयाबीनची उगवण मानकापेक्षा कमी असल्यामुळे शेतकºयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर पेरणी केलेले सोयाबीन बियाणे सदोष असल्याचे तक्रार निवारण समितीचे स्पष्ट मत आहे.- शीतल उकेतालुका कृषी अधिकारीमहाबीजकडून नुकसानभरपाई न मिळाल्यास मला आत्महत्या करावी लागेल. त्याला सर्वस्वी महाबीजच जबाबदार राहील.- युनूसखाँ महम्मदखाँनुकसानग्रस्त शेतकरी.