शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यात ‘शेतकरी कंगाल, कंपन्या मालामाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 00:03 IST

पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदा ‘हंगामातील प्रतिकूल परिस्थिती’ या घटकांतर्गत बाधित मूग, उडदाला परतावा व जिल्हाधिकाऱ्यांनी ८० महसूल मंडळांसाठी अधिसूचना काढली असल्याने सोयाबीनला आतापर्यंत विमा परताव्याचा २५ टक्के अग्रीम मिळायला पाहिजे होता. मात्र, पीक विम्यात सहभागी एकाही शेतकऱ्यांना कंपनीद्वारा परतावा दिलेला नसल्याने पीक विम्यात फक्त कंपनीचेच चांगभले होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी परतावा मिळण्यासाठी यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी २०.४४ कोटींचा पीक विमा हप्ता भरला. राज्य व केंद्र शासनाचे हिस्सा मिळून पीक विमा कंपनीकडे किमान १०० कोटी रुपये जमा होत आहे. त्या तुलनेत बाधित शेतकऱ्यांना छदामही मिळाला नसल्याने पीक विम्यात ‘शेतकरी कंगाल, कंपन्या मालामाल’ असल्याचे वास्तव आहे.पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदा ‘हंगामातील प्रतिकूल परिस्थिती’ या घटकांतर्गत बाधित मूग, उडदाला परतावा व जिल्हाधिकाऱ्यांनी ८० महसूल मंडळांसाठी अधिसूचना काढली असल्याने सोयाबीनला आतापर्यंत विमा परताव्याचा २५ टक्के अग्रीम मिळायला पाहिजे होता. मात्र, पीक विम्यात सहभागी एकाही शेतकऱ्यांना कंपनीद्वारा परतावा दिलेला नसल्याने पीक विम्यात फक्त कंपनीचेच चांगभले होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, यासाठी कृषी विभागाने जनजागृती केली. यामध्ये २.१९ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवीत दोन टक्के म्हणजेच २०,४३,४७,७७२ रुपयांचा हप्ता भरला, याशिवाय उर्वरित ९८ टक्के हिस्सा राज्य व केंद्र शासन भरणार आहेत. ८० कोटींचा हिस्सा शासनाचा राहणार आहे.

पिकनिहाय शेतकरी हिस्साकृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या खरिपात २.१९ लाख शेतकऱ्यांनी २०.२३ कोटींचा विमा हप्ता भरला आहे. यामध्ये उडदासाठी ५९.२० लाख, मुगासाठी १.१२ कोट, कपाशी ४.३६ कोटी, धान १४,७२४ रुपये, तूर १.११ कोटी, ज्वार १.९३ लाख व सोयाबीनसाठी सर्वाधिक १३.२५ कोटी रुपयांचा प्रीमियम शेतकऱ्यांनी कंपनीकडे भरणा केला आहे.

तालुकानिहाय शेतकरी प्रीमियम अचलपूर तालुक्यात ७०.०७ लाख, अमरावती १.४० कोटी, अंजनगाव सुर्जी १.५६ कोटी, भातकुली १.८४ कोटी, चांदूर रेल्वे १.२४ कोटी, चांदूरबाजार १.०७, चिखलदरा ११.४० लाख, दर्यापूर ३ कोटी, धामणगाव १.२९ कोटी, धारणी २२.७३ लाख, मोर्शी १.५९ लाख, वरूड ४६.५७ लाख, तिवसा १.७३ कोटी व नांदगाव तालुक्यात ४.१८ कोटींचा प्रीमियम शेतकऱ्यांनी भरला.

अधिसूचनेवरील कंपनीचे आक्षेप निकाली काढले आहे. पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा परताव्याचा अग्रिम द्यावा, यासाठी कंपनीला पत्र दिले आहे. कृषी आयुक्तालयानेही कंपनीला पत्र दिलेले आहे. - अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी