शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील एकाधिकारच्या १२ केंद्रांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 18:51 IST

गोरगरीब आदिवासींची फसवणूक होऊ नये, यासाठी आदिवासी शेतकऱ्यांकडील धान्याची खरेदी एकाधिकार योजनेंतर्गत केली जाते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून होणारी खरेदी आदिवासी विकास महामंडळाने यंदा सुरूच केली नाही.

ठळक मुद्देखेडा खरेदीत व्यापाऱ्यांकडून भाव पाडून लूटआदिवासी विकास महामंडळाची खरेदी बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : गोरगरीब आदिवासींची फसवणूक होऊ नये, यासाठी आदिवासी शेतकऱ्यांकडील धान्याची खरेदी एकाधिकार योजनेंतर्गत केली जाते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून होणारी खरेदी आदिवासी विकास महामंडळाने यंदा सुरूच केली नाही. सर्व बारा केंद्रांना टाळे लागले आहेत. त्यामुळे गावखेड्यात व्यापारी दर पाडून आदिवासींकडून शेतमाल खरेदी करून घेत आहेत.धारणी, चिखलदरा तालुक्यात एकाधिकार योजनेंतर्गत आदिवासींच्या सोयाबीन, गहू, चणा, तूर आदी शेतमालाची खरेदी करण्यात येते. त्यांची गैरआदिवासींकडून लूट होऊ नये, यासाठी बाजारभावानुसार ही खरेदी करण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयातून आदिवासी विकास महामंडळाला खरेदीचे दर पाठवले जातात. त्यानुसार चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, हतरू, चुरणी, टेम्ब्रुसोंडा, अंबापाटी, चिखली तसेच धारणी तालुक्यातील बैरागड, चाकर्दा, हरिसाल, साद्राबाडी, कळमखार आणि धारणी अशा एकूण बारा केंद्रांवर ही खरेदी केली जाते. यंदा एकही केंद्र सुरू न झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे त्याचा गैरफायदा घेत व्यापारी कमी दरात धान्य खरेदी करीत आहेत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने आदिवासींना रोजगाराअभावी आर्थिक चणचण जाणवू लागली. त्याचवेळी त्यांची लूट होत आहे.सर्व देश २३ मार्चनंतर लॉकडाऊन झाला. मात्र, आदिवासी विकास महामंडळाची खरेदी ऑक्टोबर महिन्यापासून बंदच आहे. सोयाबीननंतर आदिवासींचा गहू, चणा, तूर घरात पडून आहे. आता आदिवासी विकास महामंडळाने लॉकडाऊनची भीती पुढे केली आहे. प्रत्यक्षात कोरोनाची भीती सर्वांनाच आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवून खरेदी व्यवहार सुरू करण्याची मागणी होत आहे.

आदिवासी विकास महामंडळांतर्गत मेळघाटातील या बाराही खरेदी केंद्रांमधून ऑक्टोबर ते ३० जूनपर्यंत आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्याची खरेदी केली जाते. मात्र, सात महिन्यांपासून खरेदी केंदे्र उघडण्यात न आल्याने संपूर्ण सोयाबीन खासगी व्यापाऱ्यांच्या घशात गेले.लॉकडाऊनमुळे खरेदी केंद्रे उघडण्यात आली नाहीत. ते संपल्यानंतर खरेदी केंद्रेसुद्धा सुरू करण्यात येणार आहेत.-गजानन कोटलावार,प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, धारणी

टॅग्स :Farmerशेतकरी