शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन वाळवताना अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबे हवालदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 11:52 IST

पहिल्या पावसात पेरणी साधलेल्या शेतकऱ्यांनी दिवाळीच्या आधी सोयाबीन घरी आणले खरे, मात्र त्यानंतरपासून ते सोयाबीन पायाखाली तुडवताना सर्व कुटुंबीयांचे पाय तुटण्यावर आले आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या सुट्ट्या गेल्या कामातचफेरे घालून तुटण्यावर आले पाय

धीरेंद्र चाकोलकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पहिल्या पावसात पेरणी साधलेल्या शेतकऱ्यांनी दिवाळीच्या आधी सोयाबीन घरी आणले खरे, मात्र त्यानंतरपासून ते सोयाबीन पायाखाली तुडवताना सर्व कुटुंबीयांचे पाय तुटण्यावर आले आहेत. केव्हा एकदा सोयाबीनचा ओलसरपणा कमी होतो आणि यातून सुटका होते, याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.यंदाच्या खरिपात उशिरा पाऊस येऊनही चांगल्या स्थितीत असलेले सोयाबीन परतीच्या पावसाच्या तडाख्यात सापडून सडले. तथापि, सोंगण्याची घाई करून काही जणांनी सोयाबीन घरी आणण्याचा आटापिटा केला. त्यात ते यशस्वी झाले खरे; मात्र दिवाळीच्या आसपास झालेल्या पावसामुळे सोयाबीनची आर्द्रता कायम होती. बाहेर पाऊस कोसळत असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात सोयाबीन पसरले होते.आर्द्रता असल्याने या ढिगाचे तापमान प्रचंड वाढले होते. हे तापमान कमी करण्यासाठी हाता-पायाने सोयाबीन पसरविण्याचे काम सुरू झाले. हे काम साहजिकच शेतकऱ्यांच्या चिमुकल्या मुलांवर आले. दिवाळीच्या सुटीचा आनंद लुटण्याच्या मानसिकतेत असलेल्या मुलांना या कामासाठी हात-पाय झिजवावे लागले.

भारनियमनाची चिंताएरवी ग्रामीण भागात भारनियमनाची चिंता केली जात नाही. तथापि, ओलसर सोयाबीन सुकविण्यासाठी घरात दिवे व पंखे सुरू ठेवण्यासाठी भारनियमनाची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली गेली. काही घरांमध्ये कूलर लागले आहेत.मुलांच्या पायांना  आले गोळेघरात पसरविलेले सोयाबीन खाली-वर करण्यासाठी ते तुडविण्याचे काम शेतकरी कुटुंबात मुलांवर आले होते. बाहेर पाऊस कोसळत असल्याने घरात बसण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, घरी त्यांना स्वस्थ बसू न देता सोयाबीनचे काम देण्यात आले. या कामात मुलांच्या पायांना गोळे आले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी