शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

शेतकºयांची महावितरणवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:05 IST

तालुक्यातील निंभी सबडिव्हिजन अंतर्गत येणाºया गावांमध्ये भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनी मोर्शी येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देभारनियमनामुळे त्रस्त : ओलित करावे तरी कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यातील निंभी सबडिव्हिजन अंतर्गत येणाºया गावांमध्ये भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनी मोर्शी येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयावर धडक दिली. यामुळे येथे तणाव वातावरण निर्माण झाला होता.यंदा पावसाने दडी दिल्याने खरीप हंगाम बुडीत असल्यात जमा झाला. यामुळे शेतकºयांसाठी रबी हंगाम महत्त्वाचा आहे. शेतकºयांनी रबीची पेरणी केली. मात्र, सिंचनासाठी विजेची गरज असताना भारनियमन होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. निंभी सबडिव्हिजन अंतर्गत ेयेणाºया लिहिदा, नया वाठोडा, पुसला, इनापूर, पिंपळखुटा (मोठा) येथील कृषिपंपांचा पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रबी सिंचन दुरापास्त झाले आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून विजेचा लंपडाव सुरू असल्याने शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे. यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी मोर्शी येथील विभागीय कार्यालयावर धडक दिली.मोर्चात अमर गोमकाळे, सारंग देशमुख, सागर देशमुख, किशोर तट्टे, मनोहर झगडे, आशिष पाटणकर, सचिन टेकाडे, तुकाराम कुरवाळे, पंजाबराव टारपे, सुनील ठवळी, बाळू खैरकर, तानासिंग चव्हाण, मारुती कुरवाळे, अनिल घुलक्षे, प्रशांत वाघाडे, अनिल चरडे आदी शेतकरी उपस्थित होते.विजेचे अस्तित्व काही मिनिटांपुरतेचरबी पेरणीच्या सिंचनासाठी विजेची गरज असताना तिचे अस्तित्व केवळ वीस ते तीस मिनिटाच्या अवधीसाठीच असते. पुन्हा वीजपुरवठा खंडित होतो. हाशमपूर रोहित्राचा वीजपुरवठा वारंवार खंडित होतो याला नागरिकच नव्हे तर आता चक्क महावितरणचे कर्मचारी कंटाळले आहेत. स्थानिक अभियंत्याचे प्रयत्न तोकडे पडत असल्याने समस्यांमध्ये भर पडत आहे. नवीन रोहित्र बदलवून सहा महिने उलटले असतानाही वीजपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळेही अडचणीत भर पडली आहे.