लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप हंगाम जसजसा जवळ येत आहे, तसा शेतीकामांना वेग आला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी खेडुतांची पहाट शिवारातच उगवत असून, उन्ह तापण्यापूर्वी घरी परतण्याकडे त्यांचा कल आहे. पावसाला उणापुरा एक महिना शिल्लक असल्याने रखरखत्या उन्हातही शेतकऱ्यांना शेती मशागतीची कामे करावी लागत आहे. खरीप हंगामासाठी कृषी कर्जाचे वितरण लवकर करण्यात यावे. बी-बियाणे व रासायनिक खते वाजवी दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरीवगार्तून होत आहे.गतवर्षी पावसाने दगा दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला. खरिपासोबत रबीही हातचा गेला. तूर, चण्याचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत. तरीही या खरिपात निसर्ग साथ देईल आणि शेतीतून काही तरी हाती येईल, या आशेने मशागतीच्या कामाला लागला आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पेरणीकरिता बियाणे खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकरी दिसत आहेत. पुढील आठवड्यापासून बी-बियाणे, खते खरेदीसाठी कर्ज मिळविण्यासाठी बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे. पीककर्जासाठी विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये गर्दी होईल.अशी सुरू आहे पूर्वमशागतजमिनीची नांगरणी करून मातीची ढेकळे फोडणे, कुळवणी व मशागतीची कामे. सुरू आहेत. नियोजनाअभावी जमिनीत सुप्त अवस्थेत असलेली कीड व रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी जमिनीची मशागत मे महिन्यातच करण्यास शेतकरी वर्ग प्राधान्य देतो. मे महिन्यात जमिनीची मशागत करून घेतल्यास उन्हामुळे जमीन तापून अळींची अंडी, कोष उघड्यावर येतात. पक्ष्यांसाठी हे खाद्य ठरते आणि त्यांचा नायनाट होतो.
अमरावती जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीला वेग; पैशांची जुळवाजुळव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 10:57 IST
खरीप हंगाम जसजसा जवळ येत आहे, तसा शेतीकामांना वेग आला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी खेडुतांची पहाट शिवारातच उगवत असून, उन्ह तापण्यापूर्वी घरी परतण्याकडे त्यांचा कल आहे.
अमरावती जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीला वेग; पैशांची जुळवाजुळव
ठळक मुद्देबळीराजाची पहाट शिवारात