शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलन : न्यायालयाने नोंदविला राणा दाम्पत्याचा जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 05:01 IST

कापसावर आलेल्या लाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दरहेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आमदार राणा यांनी तिवसा येथे आंदोलन केले होते. तिवसा पोलिसांनी त्या प्रकरणी आमदार राणा यांना अटक करून त्यांच्यासह ६४ जणांची कारागृहात रवानगी केली होती. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनीदेखील त्याच प्रश्नावर आंदोलन केले. ते सर्व गुन्हे सरकारने मागे घ्यावे, अशी खासदार राणा यांची मागणी होती.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी सन २०२० मध्ये तिवसा येथे केलेल्या शेतकरी आंदोलनप्रकरणी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा व अन्य ६३ आरोपींचे जबाब नोंदवून घेतले. कापसावर आलेल्या लाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दरहेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आमदार राणा यांनी तिवसा येथे आंदोलन केले होते. तिवसा पोलिसांनी त्या प्रकरणी आमदार राणा यांना अटक करून त्यांच्यासह ६४ जणांची कारागृहात रवानगी केली होती. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनीदेखील त्याच प्रश्नावर आंदोलन केले. ते सर्व गुन्हे सरकारने मागे घ्यावे, अशी खासदार राणा यांची मागणी होती. त्या प्रकरणी तिवसा व स्थानिक पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्या पाचही गुन्ह्याच्या अनुषंगाने मंगळवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक ६ सुजित तायडे यांच्या न्यायालयाने सर्व आरोपींचा जबाब नोंदवून घेतले; तर पाणीप्रश्नावर केलेल्या आंदोलनाच्या तीन प्रकरणांतदेखील पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. आरोप निश्चित करण्यात आले. ते आरोप आमदार राणा यांच्यासह ४१ आरोपींनी फेटाळले. त्यामुळे त्या तीनही प्रकरणांत खटल्याला सुरुवात झाली. आंदोलनाच्या आठही न्यायालयीन प्रकरणांमध्ये आमदार राणा, खासदार राणा व युवा स्वाभिमान कार्यकर्ते व शेतकऱ्यांची बाजू ॲड. दीप मिश्रा यांनी मांडली. 

शाईफेक प्रकरणात नीलेश भेंडेला अटकपूर्व जामीनआयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणातील आरोपी नीलेश भेंडे याला मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला; याच प्रकरणात अटक झालेले राज मिश्रा व राहुल काळे यांना नियमित जामीन देण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ५ एस. बी. जोशी यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. बचावपक्षाच्या वतीने ॲड. दीप मिश्रा यांनी युक्तिवाद केला.

 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणा