धीरेंद्र चाकोलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एरवी कपाशीचे बोंडही गळू नये, याची काळजी वाहणारा शेतकरी ट्रॅक्टर घालून संपूर्ण पीक जमीनदोस्त करीत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील एरड येथील हे चित्र आहे. बीटीचे फसलेले तंत्रज्ञान व त्यावर मात करणारी बोंडअळी याला कारणीभूत आहे.एकरी २० क्विंटल उत्पादन आणि दोन वर्षांपूर्वी हाती एक लाख रुपये रोख देणारे पीक असलेली, पाच फुटांच्यावर वाढलेली बीटी पºहाटी बोंडअळीच्या उत्पातामुळे उपटूून टाकण्याचा निर्णय एरड येथील शेतकºयांनी घेतला. त्यानुसार येथील भूषण देशमुख यांनी ड्रिपवर वाढविलेली अडीच एकरांतील पºहाटी मोडून टाकली. ते वडिलांच्या नावे असलेली शेती पाहतात. त्यांना दरवर्षी एकरी २० क्विंटल कापूस हमखास होतो. यावर्षी त्यांनी बीजी-२ प्रकाराचे कपाशी बियाणे लावले. कापूस घरी येईपर्यंत ४० हजार रुपये खर्च केले. ५० क्विंटलचा अंदाज असताना आतापर्यंत अवघा पाच क्विंटल कापूस घरी आला आहे. हीच परिस्थिती गावातील अनेक शेतकरी अनुभवत आहेत. शेतातील पºहाटी हिरवीगार असली तरी अळीमुळे बोंडांच्या कवड्या झाल्या आहेत. फरदडची वाट पाहण्याऐवजी झाडे उपटण्याचा निर्णय घेऊन देशमुख यांनी पिकात ट्रॅक्टर घातला. त्याकरिता आता त्यांना ३००० रुपये लागतील, तर गोळा करण्यासाठी २००० रुपये मजुरांना द्यावे लागतील. पºहाटी तशीच उभी ठेवली, तर अळी प्रादुर्भाव पुढील वर्षीही होण्याची शक्यता आहे.गतवर्षापर्यंत एक-एक मजूर स्त्री कापसाची वेचाई करताना दिवसाला २० किलोचे गाठोडे घरी आणत होती. काही शेतकºयांनी एकरी २५ क्विंटल कापूस उत्पादनाचा आकडा गाठला. यंदा आतापर्यंत पाच क्विंटल कापूस घरी आला. या कापसातून मोठी रक्कम वेचाईची मजुरी देण्यातच जाणार आहे, असे भूषण देशमुख यांनी सांगितले. कापसापूर्वी २० क्विंटल सोयाबीन देशमुख यांनी अवघ्या ३६ हजारांत विकले. त्यातून काहीच हाती आले नाही, अशी त्यांची खंत आहे.कापसासाठी एरड प्रसिद्धकापसाचे एकरी २०-२५ क्विंटल उत्पादन एरड येथे घेतले जाते. या भरवशाच्या पिकातूनच येथील शेतकºयांनी समृद्धी मिळविली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र, यंदा कासपाने फसगत केली. तालुका कृषी अधिकाºयांनी पाहणी केली. यासंदर्भात जिल्हास्तरावर एसएओ आॅफिसवर गावातील आठ जणांच्या तक्रारी गेल्या आहेत. तथापि, या कार्यालयाकडून अद्याप पाहणी झालेली नाही. त्यामुळे नुकसानभरपाईची शक्यता मावळल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.दराचीही मारामारबोंडअळीचा प्रादुर्भाव असलेल्या कापसाला दोन हजारांच्या खालीच मागणी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कापूस बाजार समितीत न्यायचा, तर १०० रुपये क्विंटलने वाहतूक खर्च व रोख रकमेसाठी दलालाकडून काही कपात होते.मी ‘अमृतराव देशमुख’ पॅटर्नचा अवलंब करीत ड्रिपवर पºहाटी वाढविली. हिरवीगार पºहाटी मोडताना वेदना झाल्या. गावातील इतरही शेतकरी याच निर्णयापर्यंत पोहोचले आहेत. घेतलेले कष्ट वाया गेले आहेत.- भूषण देशमुख, प्रगतिशील शेतकरी, एरड
एरड येथील शेतकºयांनी कपाशीत घातला ट्रॅॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:00 IST
एरवी कपाशीचे बोंडही गळू नये, याची काळजी वाहणारा शेतकरी ट्रॅक्टर घालून संपूर्ण पीक जमीनदोस्त करीत आहे.
एरड येथील शेतकºयांनी कपाशीत घातला ट्रॅॅक्टर
ठळक मुद्देशेतकºयांचा एकमुखी निर्णय : पिकाने शेतकºयांना लावले देशोधडीला