शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ४१ शिक्षाप्राप्त लाचखोर बडतर्फीपासून दूर, शासन विभागांची माया कायमच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 17:01 IST

अमरावती : लाचखोरीचा आरोप सिद्ध होऊन कारावासाची शिक्षा सुनावलेल्या राज्यातील ४१ लाचखोरांना अद्यापही शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले नाही.

प्रदीप भाकरेअमरावती : लाचखोरीचा आरोप सिद्ध होऊन कारावासाची शिक्षा सुनावलेल्या राज्यातील ४१ लाचखोरांना अद्यापही शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले नाही. शिक्षा ठोठावूनही ते कार्यरतच असल्याने शासकीय यंत्रणेला लेटलतिफीच्या आजाराची लागण कितपत झाली आहे, त्याचे द्योयक ठरली आहे.लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर किंवा लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर संबंधित लाचखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली जाते. प्रकरणाचे गांभीर्य पाहून निलंबनाची कारवाई केली जाते. दरम्यान, तपास पूर्ण करून संबंधित लाचखोर आरोपीविरुद्ध न्यायालायात दोषारोपपत्र दाखल केले जाते. साक्षीदार व प्रत्यक्षदर्शी व अन्य पुराव्यांचा तपास करून न्यायालयीन निर्णय दिला जातो. ज्या लोकसेवकांना न्यायालयाने दोषी ठरवून कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली त्या शासकीय अधिकारी, कर्मचा-यांना सेवेतून बडतर्फ करणे अनिवार्य आहे.तथापि यंदा राज्यातील ज्या ४१ लाचखोरांना सापळा प्रकरणात शिक्षा झाली. मात्र, त्यांना अद्यापही बडतर्फ केले नसल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जारी केली आहे. न्यायलायाने दोष सिद्ध केल्यानंतर संबंधित विभागाने लाचखोरांची माहिती वरिष्ठांकडे पाठवून त्याांना बडतर्फ करणे अपेक्षित असताना तशी कारवाई न झाल्याने ते ४१ लाचखोर अधिकारी कर्मचारी अद्यापही शासकीय सेवेत कार्यरत आहेत. उल्लेखनीय म्हणजे यातील बहुतांश लाचखोरांना न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी, दोन वर्षे सश्रम कारवास अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्या आहेत. त्यानंतरही त्यांचे वेतन व भत्ते काढले जात आहेत.यात वर्ग १ चे चार, वर्ग २ चे ३ अधिकारी, वर्ग ३ चे ३३ व अन्य एका लोकसेवकांचा समावेश आहे. यात मुंबई परिक्षेत्रातील ६, ठाण्यातील ४, पुणे परिक्षेत्रातील २, नाशिकमधील ६, अमरावतीमधील १, औरंगाबादमधील ६ व नांदेड परिक्षेत्रातील ७ लाचखोरांचा समावेश आहे.या विभागांची आहे जबाबदारीजे ४१ शिक्षाप्राप्त लाचखोर अद्यापही शासकीय सेवेतून बडतर्फ केलेले नाही, त्यात गृहविभागातील १०, महसूल -भूमिअभिलेख -नोंदणी -९, ग्रामविकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रत्येकी ४, नररविकास, ऊर्जा, म्हाडा, समाजकल्याणमधील प्रत्येकी २, तर विधी व न्याय, वन, आदिवासी, राज्य उत्पादन शुल्क, कृषी व वैद्यकीय शिक्षणमधील प्रत्येकी एका लाचखोराचा समावेश आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती