तालुक्यात २८ हजार ७१३ लाभार्थी : वर्षभरात २० कोटींच्या अनुदानाचे वाटपचांदूरबाजार : तालुक्यात राज्य शासनाच्या राष्ट्रीय अर्थसहाय योजनेअंतर्गत श्रावण बाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी, वृद्धापकाळ व कुटुंबसहाय इत्यादी संलग्नीत योजनांमार्फत २८ हजार ७१३ लाभार्थ्यांना २० कोटी ९ लाख ३०० रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले. यामुळे वृद्ध, अपंग, परित्यक्ता व निराधारांना बळ मिळाले आहे. महसूल विभागाकडून मागील २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात, तालुका पातळीवर नियमानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. विविध योजनाअंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी करून लाभार्थ्यांची निवड करण्यात येऊन, सर्व शासकीय नियमांचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच प्राप्त लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. ही पात्र यादी वरिष्ठांमार्फत शासनाकडे पाठविल्यानंतर तालुक्याच्या संबंधित विभागाला या योजनेचे अनुदान प्राप्त झाले होते. पात्र लाभार्थ्यांमध्ये मागील आर्थिक वर्षात ३१ मार्च २०१६ पर्यंत श्रावण बाळ योजनेअंतर्गत १८ हजार २८५ तर इंदिरा गांधी वृद्धपकाळ अंतर्गत ५ हजार ६९८ अशा एकूण २३ हजार ९८३ लाभार्थ्याचा समावेश होता. या सर्व लाभार्थ्यांना प्रतिमहिना ६०० रुपये प्रमाणे मागील वर्षात १४ कोटी ९९ लाख, ८३ हजार ८०० रुपयांचे अनुदान अर्थसहाय म्हणून वितरित करण्यात आले आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेंतर्गत तालुक्यातील विधवा, परित्याक्ता व अपंग असलेल्या ४ हजार ७३० लाभार्थ्यांना ही निर्धारित मासिक अनुदानापोटी ३ कोटी ४७ लाख ७४ हजार ५०० रुपयांचे अनुदान आर्थिक आधार म्हणून वितरित करण्यात आले. या आर्थिक महतीमुळे योजनेतील सर्व लाभार्थ्यांना जगण्याची दिशा मिळाली आहे. राष्ट्रीय अर्थसहाय योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांमधील महत्वाची योजना मह्णजे कुटूंबअर्थसहाय योजना होय. या योजनेत नियमानुसार १८-५९ वर्षाचपर्यंतच्या कुटूंब प्रमुखाचा नैसर्गिक मृत्यु झाल्यास त्या कुटूंबाला तातडीने २० हजार रुपयांचे अर्थसहाय देण्यात येते. कुटूंब प्रमुखाच्या मृत्युने हादरलेल्या कुटूंबाला ही मदत आपत्तीकाळात अ त्यंत मोलाची ठरते. या योजनेअंतर्गत तालुक्यातील १०७ कुटूंबाना २१ लाख ४० हजार रुपयांचे अर्थसहाय करयात आले. त्यामुळे या कुटूंबाना कठिन काळात जगण्याचे बळ मिळाले. (तालुका प्रतिनिधी)
कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा ‘निराधारांना आधार’
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST