शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, महिला ‘व्हेंटिलेटर’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:25 IST

कुटुंब नियोजन शिबिरात करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर एका महिलेची प्रकृती गंभीर झाली. तिला उपचारासाठी नागपूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे१५ दिवसांपासून अतिदक्षता विभागात : आरोग्य कर्मचारी तैनात, कमालीची गोपनियता

अमोल ढवसे/संजय जेवडे ।आॅनलाईन लोकमतनांदगाव खंडेश्वर : कुटुंब नियोजन शिबिरात करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर एका महिलेची प्रकृती गंभीर झाली. तिला उपचारासाठी नागपूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर महिला तेथे तब्बल पंधरा दिवसांपासून अतिदक्षता विभागात आहे. विशेष म्हणजे, तिच्या प्रकृतीवर निरगणीसाठी तालुक्यातील दोन आरोग्य कर्मचारी दररोज हजेरी लावत आहेत. प्रकरण अंगलट येण्याची भीती असल्याने आरोग्य यंत्रणेद्वारा याविषयी कमालीची गुप्तता पाळली जात आहे.पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ नोव्हेंबरला महिलांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित होते. यामध्ये १६ महिलांवर कुुटुंब नियोजन (टाक्याची) शस्त्रक्रिया करण्यात आली. यापैकी कांता भगत या महिलेची प्रकृती पाच दिवसानंतर अचानक गंभीर झाली. डॉक्टरांकडे तक्रार केल्यावर, औषधोपचार झाल्याचे उत्तर मिळाले. मात्र, उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने कांता भगत यांना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, याची तक्रार नातलगांनी ना. डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली. त्यांनी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिल्यानंतर महिलेला १३ नोव्हेंबरला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. पंधरा दिवसांपासून ही महिला तेथील वार्ड क्र. २९ मध्ये अतिदक्षता विभागात आहे. कुटुंब नियोजनासारख्या साध्या व सोप्या शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने भगत कुटुंब कमालीच्या चिंतेत आहे.दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश अस्वले यांच्यासह नांदगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी साहेबराव इंगळे, पापळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दिनकर मुरादे व या महिलेवर शस्त्रक्रिया करणाºया भातकुली तालुका वैद्यकीय अधिकारी वैशाली पाटील आदी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नियमित भेटी देत असल्याचे विश्वसनीय माहिती मिळाली आहे.एक लिटर पू काढलारुग्णाला प्रकृती खालवत असल्याने अमरावती येथे दाखल करण्यात आले. येथून नागपूर रेफर करण्यामागे काय कारण आहे, या प्रश्नावर नातलगांना गोलगोल उत्तर देण्यात आली. नागपूर येथे उपचारादरम्यान पुन्हा शस्त्रक्रिया करून तब्बल एक लीटर पू काढल्याची माहिती महिलेच्या पतीने ‘लोकमत’ला दिली.तालुक्यातील दोन कर्मचाऱ्यांची दररोज ड्युटीप्रकरण शेकणार असल्याने नांदगाव तालुक्यासह जिल्हा आरोग्य यंत्रणाद्वारा आता सारवासारव केली जात आहे. नागपूर येथे दाखल महिला रुग्णावर लक्ष ठेवण्यासाठी तालुक्यातील दोन वैद्यकीय कर्मचाºयांची दररोज आळीपाळीने ड्यूटीच लावण्यात आली आहे. शुक्रवारीदेखील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दिनकर मुरादे व तालुका वैद्यकीय अधिकारी साहेबराव इंगळे नागपुरात तळ ठोकून आहेत. याविषयी आरोग्य यंत्रणा कमालीची गुप्तता पाळत आहे.कांतावर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर पाच दिवसांनी तिची प्रकृती ढासळली. नेमके काय झाले, हे आता सांगता येणार नाही. याच शिबिरात अन्य रुग्णांवरही शस्त्रक्रिया झाली. त्यांची प्रकृती उत्तम आहे.- वैशाली पाटीलशल्यचिकित्सककांता भगत या रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. मी स्वत: दोन वेळा नागपूरला भेटी दिल्या. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जखमेतील पू काढला. संसर्ग झाल्याची शक्यता आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची चमू उपचार करीत आहेत.- सुरेश असोलेजिल्हा वैद्यकीय अधिकारीकुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर पत्नीची प्रकृती गंभीर झाली. डॉक्टर काहीही सांगत नाहीत. शस्त्रक्रिया चुकली असावी. नागपूरला पुन्हा शस्त्रक्रिया करून एक लिटर पू काढला. धोकादायक स्थिती टळल्यानंतर याची तक्रार करू.- अरविंद भगत,पती