शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

By admin | Updated: May 2, 2015 00:32 IST

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५५ वा वर्धापन दिन शहरात उत्साहात पार पडला. ...

परेडचे निरीक्षण : जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांची उपस्थितीतअमरावती : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५५ वा वर्धापन दिन शहरात उत्साहात पार पडला. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य शासकीय समारंभात सकाळी ८ वाजता राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. ध्वजारोहरणानंतर सर्वांनी राष्ट्रगीत गायिले. पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले. याप्रसंगी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे, महापौर चरणजितकौर नंदा, माहिती आयुक्त डी.आर. बनसोड आदी उपस्थित होते. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी किरण गित्ते हे पश्चिम त्रिपुराची राजधानी आगारतळा येथे कार्यरत असताना आर्थिक समावेशन प्रकल्प उत्कृष्टरीत्या राबविल्याबाबत पंतप्रधानांच्या हस्ते २१ एप्रिल रोजी पहिला लोकप्रशासन पंतप्रधान पुरस्कार प्राप्त झाला. त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. अमरावती विभागस्तरावर उत्कृष्ट कामाबद्दल उपजिल्हाधिकारी सर्वश्री गजेंद्र बावणे, तहसीलदार श्रीकांत उंबरकर, स्वीय सहायक महेंद्र गायकवाड, लघुलेखक रवींद्र मोहोड, कनिष्ठ लिपिक विजय सूर्यवंशी, मंडल अधिकारी अमोल देशमुख, तलाठी प्रवीण कावलकर, शिपाई रमेश मोरे यांचा गौरव करण्यात आला. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा सन २०१२-१३ साठी ग्रामपंचायत मडाखेड यांना दहा लाखांचा प्रथम पुरस्कार, ग्रामपंचायात चेनुष्ठा ता.तिवसा, ग्रामपंचायत चिंचोली यांना विभागून प्रत्येकी चार लाख रुपयांचा द्वितीय क्रमांकाचे सामूहिक बक्षीस देण्यात आले. साने गुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धेचा प्रथम पुरस्कार सांगळुद जिल्हा परिषदेस शाळेस एक लाख रुपयाचा प्रथम पुरस्कार, सावित्रीबाई फुले स्वच्छ आंगणवाडी स्पर्धा ५० हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार, गव्हाणकुंड येथील अंगणवाडी केंद्रास देण्यात आला. स्व.वसंतराव नाईक स्मृती पुरस्कार ग्रामपंचायत धानोरा बु. यांना ३० हजार रुपयांचे बक्षीस, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार ग्रामपंचायत आगर यांना ३० हजार रुपये बक्षीस, स्व.आबासाहेब खेडकर यांना स्मृती पुरस्कार ग्रामपंचायत खडका यांना ३० हजारांचे बक्षीस, साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार सन २००९-१० प्रथम पुरस्कार एक लाख रुपये जिल्हा परिषद शाळा महमदपूर ता.बाबुळगाव यांना देण्यात आला. सावित्रीबाई फुले स्वच्छ आंगणवाडी पुरस्कार सन २००९-१० पुरस्कार आंगणवाडी केंद्र राहुड यांना देण्यात आला. पर्यावरण संतुलन समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत देवगाव ग्रामपंचायत घोडगाव ग्रामपंचायत चेनुष्ठा, चांदूरवाडी व ग्रामपंचायत भिलटेक यांना विकासरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त केल्याबद्दल दीक्षा गायकवाड, पायल अजमिरे, निहारिका परिहार, शलका धामणगावकर, पूजा कोसे, सांजली वानखडे, वैष्णवी श्रीवास, सुमित गव्हाणे आदीचा गौरव करण्यात आला.