शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर तालुक्यात बनावट बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:55 IST

अचलपूर तालुक्यात बनावट व विनापरवाना बियाणांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. गुप्त माहितीच्या आधारे कृषी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत बनावट बियाणे जप्त करण्यात आले असून, संबंधितांविरुद्ध परतवाडा पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकृषी विभागाच्या दोन ठिकाणी धाडी : परतवाडा ठाण्यात गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यात बनावट व विनापरवाना बियाणांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. गुप्त माहितीच्या आधारे कृषी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत बनावट बियाणे जप्त करण्यात आले असून, संबंधितांविरुद्ध परतवाडा पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.श्यामलाल बजरंगलाल अग्रवाल (रा.कांडली) आणि राजू नारायणदास अग्रवाल (रा. रामनगर कांडली) असे विनापरवाना व बनावट बियाणे विक्री करणाºया दुकानदारांची नावे आहेत. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव यांनी तक्रार नोंदविली. सातव यांच्यासह पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुणवत्ता निरीक्षक राम देशमुख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दुकानाची तपासणी करण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना बियाणे विक्री होत असल्याचे आढळून आले. यासंदर्भात परतवाडा पोलिसात फिर्याद दाखल करून दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही दुकानदार विनापरवाना बियाणे विकत असताना त्यांनी हे बियाणे आणले कोठून, या दिशेने पोलिसांनी तपास चालविला आहे. भरारी पथकातील कृषी सहायक रोहित गावंडे, सतीश मोकडे, अशोक सोळंके, कृषी अधिकारी राजू देशमुख, पंच नागेश हिरुळकर, सागर मावळे यांनीही या कारवाईत सहभाग दर्शविला.जुळ्या शहरासह ग्रामीण भागात विक्रीपरतवाडा शहरालगत मेळघाटचा परिसर आहे. त्यामुळे परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात विनापरवाना बियाण्यांची विक्री केली जात असल्याचे या घटनेने उघडकीस आले आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या भरारी पथकाने त्यांची तपासणी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.