आॅनलाईन लोकमतअमरावती : महापालिका क्षेत्रातील विविध ५६ ‘लेअर्स’ची माहिती संकल्पित करून तिचे डिजिटायझेशन करण्याच्या नावावर १.३३ कोटींची अनियमितता करणाऱ्यांची नावे लवकरच उघड होणार आहेत. आ. सुनील देशमुख यांनी पुन्हा एकदा या अनियतितेबाबत महापालिका प्रशासनाला विचारणा केली असून तीन दिवसांच्या आत विस्तृत अहवाल मागविला आहे.१३३ कोटींचे लाभार्थी कोण’ या वृत्तातून ‘लोकमत’ने सायबर टेक व प्रशासनातील काहींचा अनियमिततेवर प्रकाशझोत टाकला. आ.सुनील देशमुख यांनीच या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यांच्याच निर्देशानुसार आयुक्त हेमंत पवार यांनी चौकशी समिती गठित केली. मात्र, सात महिने उलटूनही चौकशी समिती शेवटास पोहोचली नसल्याने दोषींचे घोडे गंगेत न्हाले होते. त्याअनुषंगाने या चौकशीला अंतिम रुप देण्याचे निर्देश आ. देशमुख यांनी महापालिका उपायुक्त महेश देशमुख यांना दिले. तीन दिवसांची मुदत त्यांना देण्यात आली. सायबर टेक कंपनीला सुमारे १.६० कोटी रुपयांत डिजिटायझेशन डाटाबेस निर्माण करण्याचे कार्य २०११-१२ मध्ये सोपविण्यात आले होते. एडीटीपीतील एका अभियंत्यांनी सायबर टेकची ‘री’ ओढून ९० टक्के देयक काढून देण्यात महत्त्वाची भूमिका वठविली. मात्र, आज पाच वर्षांनंतर त्यातील कुठलेही काम महापालिकेत दिसत नसून केवळ सॉफ्टवेअरच्या नावावर त्या कंपनीला १.३३ कोटींचे देयके देण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.या संदर्भातील पाळेमुळे खणून काढण्यासाठी २ जून २०१७ रोजी चौकशी समिती गठित झाली. चौकशी ९० टक्के पूर्ण झाली असून मुख्य लेखापरीक्षकांचा अहवाल झाल्यानंतर अंतिम अहवाल या आठवड्याअंती आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. अहवालाअंती १.३३ कोटींचे लाभार्थी निश्चित होतील.सायबरटेकबाबत आयुक्तांना विचारणा केली. बुधवारी त्याबाबत महापालिका आयुक्तांना पत्रही दिले. या आठवड्यात प्रशासन अंतिम अहवाल देईल.- सुनील देशमुख,आमदार, अमरावती
सायबरटेकमधील दोषींचे चेहरे तीन दिवसात उघड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:08 IST
महापालिका क्षेत्रातील विविध ५६ ‘लेअर्स’ची माहिती संकल्पित करून तिचे डिजिटायझेशन करण्याच्या नावावर १.३३ कोटींची अनियमितता करणाऱ्यांची नावे लवकरच उघड होणार आहेत.
सायबरटेकमधील दोषींचे चेहरे तीन दिवसात उघड !
ठळक मुद्देसुनील देशमुखांचा पाठपुरावा : उपायुक्तांना निर्देश