शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकांच्या अतिरिक्त जागेचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:52 IST

अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील अतिरिक्त जागेचे सर्वेक्षण केले असून, काही महिन्यातच व्यापारी संकुल निर्मितीला प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विनावापर जागेचा कायापालट होऊन रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहे.

ठळक मुद्देव्यापारी संकुल साकारणार : बीओटी तत्त्वावर पुनर्विकास, उत्पन्नवाढीसाठीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील अतिरिक्त जागेचे सर्वेक्षण केले असून, काही महिन्यातच व्यापारी संकुल निर्मितीला प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विनावापर जागेचा कायापालट होऊन रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहे.राज्यातील ३८ रेल्वे स्थानकांचा बीओटी तत्त्वावरील पुनर्विकासात समावेश असून, ‘अ’ वर्गात मोडणाऱ्या अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. अतिरिक्त जागेचा व्यवसायासाठी वापर करण्याचे प्रस्तावित आहे. साकारलेल्या भव्य मॉडेल रेल्वे स्थानकाची देखभाल, दुरुस्तीसाठी मोठी यंत्रणा लागत असल्याने रेल्वेला आर्थिक भार सहन करावा लागत आहे. परंतु, येत्या काळात अमरावती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास झाल्यास उत्पन्नातून येणारी रक्कम या स्थानकावर खर्च करून प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा देण्यावर भर राहणार आहे. इर्विन परिसरात अतिरिक्त जागा असून या जागेवर व्यापारी संकुल उभारल्यास मोठी रक्कम रेल्वेला मिळेल, असा अंदाज आहे. रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करताना अतिरिक्त जागेवर व्यापारी संकुल निर्माण करताना खासगी क्षेत्रासह सर्व इच्छुकांकडून स्पर्धात्मक निविदा मागवण्यिाचे धोरण आहे. या नव्या निर्णयामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोयीसुविधा पुरविताना कोणताही खर्च लागणार नाही, हे विशेष. या अतिरिक्त जागेच्या अनुषंगाने निविदाकर्ता कल्पकतेनुसार व डिझाईननुसार रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करेल, असे या योजनचे स्वरुप आहे. काही वर्षांपासून ओस पडलेल्या अतिरिक्त जागेचा कमर्शियल वापर होणार असल्याने रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध होईल. मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या महाप्रबंधकांच्या आदेशानुसार या अतिरिक्त जागेचे सर्वेक्षण झाले आहे.पुणेच्या कन्सलटंसीकडून सर्वेक्षणअमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकाच्या अतिरिक्त जागेवर साकारण्यात येणाºया व्यापारी संकुलाच्या निर्मितीसाठी पुणे येथील कन्सलटंसीने जागेचे सर्वेक्षण केले आहे. अतिरिक्त जागेचे मोजमाप करून व्यापारी संकुल निर्मितीसाठी वापर योग्य जागेचा अहवाल रेल्वेच्या वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत व्यापारी संकुल निर्मितीच्या ई-निविदादेखील काढण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.अमरावती रेल्वे स्थानकाच्या अतिरिक्त जागेसंदर्भात यापूर्वीच सर्वेक्षण झाले आहे. इर्विन रूग्णालयाच्या बाजूकडील जागेवर व्यापारी संकुल प्रस्तावित आहे. त्यानंतरची कार्यवाही डीआरएम कार्यालयस्तरावरून होत आहे.- सुनील वासेकरविभागीय अभियंता, बडनेरा