शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा अर्जास ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:18 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर केल्याचा आर्थिक फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी आॅक्टोबरच्या परीक्षा अर्जांना ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शुक्रवारी घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाचा निर्णय : सेमिस्टर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर केल्याचा आर्थिक फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी आॅक्टोबरच्या परीक्षा अर्जांना ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शुक्रवारी घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.‘लोकमत’ने ३१ आॅगस्ट रोजी ‘विद्यापीठाने एकाच विद्यार्थिनीला दिल्या दोन गुणपत्रिका’ या शीर्षकाचे वृत्त प्रकाशित करून परीक्षा विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी या वृत्ताची दखल घेत आॅक्टोबरच्या परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा अर्ज भरण्यास ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढीचा आदेश विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांच्या स्वाक्षरीने जारी झाला आहे. यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, हे विशेष. बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी भाग-२ सेमिस्टरच्या तृतीय परीेक्षेसाठी हा नियम लागू राहील. विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज ७ सप्टेंबरपर्यंत, तर महाविद्यालयांना विद्यापीठात परीक्षा अर्ज १५ सप्टेंबरपर्यंत सादर करावे लागतील. महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून विहीत विलंब शुल्कासह १४ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारतील, तर महाविद्यालयांना विद्यापीठास १९ सप्टेंबरपर्यंत परीक्षा अर्ज सादर करावे लागणार आहेत, असे आदेशात नमूद केले आहे.उशिरा निकालाचा भुर्दंड आम्ही का भरावा?चांदूर रेल्वे येथील कला, वाणिज्य महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना बी.ए. भाग १ (सेमिस्टर २) निकालाची गुणपत्रिका २५ आॅगस्ट रोजी मिळाली. या गुणपत्रिकेवर ४ आॅगस्ट रोजी निकाल जाहीर झाल्याचे अंकीत आहे. दरम्यान, परीक्षा अर्जासोबत विलंब शुल्क भरण्याची सक्ती महाविद्यालयाकडून करण्यात आली. परंतु, गुणपत्रिका विलंबाने मिळाल्या, तर भुर्दंड कशासाठी भरावा, असे गाºहाणे शुंभागी घोरपडे, स्नेहल गोंडाने, सोनाली विरूडकर, भारती भगत, मीरा चव्हाण, नेहा पाटमासे आदींनी प्राचार्यांपुढे मांडले.गरीब, सामान्य विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज विलंब शुल्क का सहन करावा, हादेखील महत्त्वाचा भाग आहे. परंतु, विद्यापीठाने परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिल्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.- प्रा. प्रदीप दंदेजिल्हाध्यक्ष, रिपाइं