शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याला ३१ जुलैपर्यत मुदतवाढ

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 15, 2024 19:07 IST

केंद्रांवर गर्दी, सहभाग कमी : सोमवारी दुपारपर्यंत ३.४६ लाख शेतकरी नोंदणी

अमरावती : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपयात सहभाग घेता येतो. गतवर्षी ५.०५ लाख शेतकऱ्यांचा सहभाग लाभला होता. त्यातुलनेत यंदा शेवटच्या दिवशी म्हणजेच १५ जुलै रोजी दुपारी २ पर्यंत फक्त ३.३६ लाख शेतकरी सहभाग लाभला आहे. सीएससी केंद्रांवर गर्दी, नेटचा खोडा यामुळे शेतकरी सहभागापासून वंचित राहू नये, यासाठी केंद्र शासनाने योजनेत शेतकरी सहभागासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपिट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खन, दुष्काळ, पावसातील खंड, किंड व रोग इत्यादी बाबीं मुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान इत्यादी जोखमीच्या बाबीचा योजनेत समावेश करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपूते यांनी दिली.             

योजनेतंर्गत विमा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. शेतकरी हिस्सा राज्य शासन भरणा करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपयाच्या नोंदणीमध्ये योजनेमध्ये सहभाग घेता येतो.   

‘लाडक्या बहिणी’चाही फटकामुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या कागदपत्रासाठी सध्या आपले सरकार सेवा केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे व या सेतूचालकांनी सीएससी केंद्राचे देखील परवाने घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागासाठी या केंद्रात जावे लागते. या केंद्रात मोठी गर्दी असल्याने सर्वांचा जोर सध्या याच योजनेत असल्याने शेतकरी सहभाग कमी लाभल्याचे सांगण्यात आले.

"सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होता यावे, यासाठी केंद्र शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदवावा."- किसनराव मुळे, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीfarmingशेतीAmravatiअमरावती