शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडंूसोबतचे अनुभव ‘कडू’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:08 IST

परतवाड्यात राहताना ‘बच्चू कडू यांचे भाड्याचे घर’ अशी पाटी लागते, तर दुसरीकडे ते मुंबईत ४२ लाखांची सदनिका विकत घेतात.

ठळक मुद्देगोपाल तिरमारे : मुंबई येथील सदनिकेची माहिती द्यावी

आॅनलाईन लोकमतअमरावती : परतवाड्यात राहताना ‘बच्चू कडू यांचे भाड्याचे घर’ अशी पाटी लागते, तर दुसरीकडे ते मुंबईत ४२ लाखांची सदनिका विकत घेतात. निवडणुकीच्या शपथपत्रात त्यांनी खोटी माहिती सादर केली, असा आरोप चांदूर बाजार नगरपालिकेचे शिक्षण व बांधकाम सभापती गोपाल तिरमारे यांनी येथे पत्रपरिषदेत केला. बच्चू कडू यांचा स्वीय सहायक असताना आलेले अनुभव कडू असल्याचे ते म्हणाले.गोपाल तिरमारे म्हणाले, अचलपूर मतदारसंघाची निवडणूक लढविताना बच्चू कडू यांनी एक-एक रुपया गोळा के ला होता. लोकांनी त्यांना मदत केली, निवडून दिले. सोफिया प्रकरणाच्या वेळी ते अंगात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत लढण्याचा दावा करीत होते. त्यांचा तो लढवय्या बाणा आता कुठे उरला आहे? विधान परिषद व राज्यसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी आर्थिक तडजोड केली.बच्चू कडू यांची साथ सोडल्यावर त्यांनी मुंबईत खरेदी केलेल्या सदनिकेची माहिती गोळा करीत होतो. त्यांनी सदनिका घेण्यासाठी कर्ज काढले. याचा उल्लेख त्यांनी निवडणूक अर्जात केला; सदनिकेचा उल्लेख का केला नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यांच्याविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी व सामान्य प्रशासन विभाग प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केली असल्याचे तिरमारे यांनी सांगितले. सदनिकेसंदर्भात त्यांनी पंधरा दिवसांत खुलासा करावा, असेही गोपाल तिरमारे म्हणाले. पत्रपरिषदेला योगेश पवार, आनंद अहिर, मुरली माकोडे, जितू मस्करे, रूपेश लहाने, गजानन राऊत उपस्थित होते....म्हणून माझ्यावर गुन्हाआमदार बच्चू कडू यांच्या सदनिकेची माहिती घेत असल्यानेच फ्रेजरपुरा ठाण्यात माझ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असावा. तो खोटा असल्याने रद्द होईलच, असेही ते म्हणाले. उमेदवारी अर्ज भरताना दिलेली माहिती खोटी असल्याचा आम्ही पुरावा दिला असून, त्यासंदर्भात आसेगाव ठाण्यात तक्रार केली आहे, असेही गोपाल तिरमारे म्हणाले.यावर मला कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. माझा कुठलाही कार्यकर्ता प्रतिक्रिया देईल.- बच्चू कडूआमदार, अचलपूर