शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

खर्च २७ हजार, हाती आले १२ हजार; सांगा कसेभागायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:39 IST

‘एकाचे दहा हजार’ करण्याची धमक शेतकºयांमध्ये आहे, हे गृहीत धरून त्यांच्यासाठी शासनाने अनेक योजना आणल्या.

ठळक मुद्देसमृद्धीच्या योजना कागदावरच शेतकºयांच्या कर्जाच्या खाईत गटांगळ्या

धीरेंद्र चाकोलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘एकाचे दहा हजार’ करण्याची धमक शेतकºयांमध्ये आहे, हे गृहीत धरून त्यांच्यासाठी शासनाने अनेक योजना आणल्या. मात्र, त्या कागदावरच आहेत, तर शासकीय यंत्रणा नवीन पिकांच्या प्रचार-प्रसाराबाबत उदासीन आहे. त्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील श्यामराव देशमुख यांच्यासारख्या अनेक शेतकºयांची पारंपरिक पिके काढून कर्जबाजारी होण्यातच जिंदगानी चालली आहे.बोरी येथे भाऊराव श्यामराव देशमुख यांचे ४ एकर १८ गुंठे (१ हेक्टर ७८ आर) शेती आहे. त्यांनी यंदा खरिपातील पेरणीसाठी ६६ हजार रुपये बँकेकडून कर्जाची उचल केली आणि शेतात सोयाबीन व तुरीचा पेरा केला. शेती तयार करण्यापासून पीक बाजारात विकण्यापर्यंत आलेला एकूण खर्च २७ हजार ५०० रुपये त्यांनी टिपणवहीत नोंदवून ठेवला. ही रक्कम पिकांकरिता वारेमाप खर्च करणाºया इतर शेतकºयांच्या तुलनेत माफक असली तरी त्यांना झालेल्या उत्पन्नाचा आकडा पाहता, तीन महिने घेतलेल्या अफाट कष्टाचे चीज झाले काय, असा प्रश्न पडतो. या चार एकरातून काढलेल्या ९ क्विंचल ६५ किलो सोयाबीनची त्यांनी बाजारात विक्री केली असता, १४ हजार ६०४ रुपये त्यांच्या हातात पडले. त्यांना आताच १३ हजार रुपये तोटा सहन करावा लागला आहे. शेतात उभी असलेली तूर थेट मार्चमध्ये हाती येईल तोपर्यंत व्यवहार कशावर भागवायचे, हा त्यांचा थेट प्रश्न आहे.भावही पडले : गेल्या दोन वर्षांपासून शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांकडून व्यापारी खरेदी करीत आहेत. अमरावती येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत विकूनही अवघा १५५० रुपये प्रतिक्विंटल भावाने ९६५ किलो सोयाबीनचे १४ हजार ७९८ रुपये अडत्याने नोंदवले. त्यामधूनही अडत, मापाई, फुडाई, उतराई, कटाई असे मिळून १८४ रुपये कापून घेण्यात आले. त्यामुळे १४ हजार ६०४ रुपये देशमुख यांच्या हाती पडले.कृषी विभागाच्या योजना कोणासाठी?एम किसान, शेतकरी उत्पादक कंपनी, जमीन आरोग्य पत्रिका, गुणवत्तापूर्ण बियाणे व खतांची उपलब्धता, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री कृषिसिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण, आंतरपीक पद्धतीस प्रोत्साहन, फलोत्पादन वृद्धीसाठी विशेष अभियान आदी शासकीय उपक्रम व योजना राबविल्या जातात. तरीही शेतकरी दुष्काळाच्या खाईत लोटला जात आहे. या योजना नेमक्या कोणासाठी, याबाबत शेतकºयांमध्ये अनभिज्ञता व ग्रामपातळीवर जनजागृतीबाबत औदासीन्य आहे.उत्पादन घटलेकाही वर्षांपूर्वी सोयाबीनचे हमखास पीक मानले जायचे. मात्र, त्याची उत्पादकता अलीकडच्या वर्षांमध्ये घटत आहे. यंदा एकरी किमान पाच क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना केवळ दोन-अडीच क्विंटल प्रतिएकर उतारा मिळाला. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला.