शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

खळबळजनक! दिव्यांग महिलेचा अत्याचारानंतर खून; मृतदेह स्वतःच्या घरातच रजईत गुंडाळून ठेवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2022 21:59 IST

Amravati News अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथे ५६ वर्षीय दिव्यांग महिलेवर बलात्कार करून ३२ वर्षीय युवकाने तिचा खून केला. खुनानंतर त्या महिलेचा मृतदेह स्वतःच्या घरातच रजईत गुंडाळून ठेवल्याची घटना शुक्रवारी घडली.

अमरावती : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथे ५६ वर्षीय अल्पसंख्याक असहाय महिलेवर बलात्कार करून ३२ वर्षीय युवकाने तिचा खून केला. खुनानंतर त्या महिलेचा मृतदेह स्वतःच्या घरातच रजईत गुंडाळून ठेवल्याची घटना शुक्रवारी पथ्रोट येथे घडली. सायंकाळी ४ च्या सुमारास घडलेली ही घटना रात्री साडेआठ वाजता उजेडात आली.

मृत महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी आरोपी विशाल जगन्नाथ नांदूरकर(३२, रा. तांबटकरपुरा, पथ्रोट) याच्याविरुद्ध खून, अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. तत्पूर्वी, घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी रात्री जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ व अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव यांनी घटनास्थळाला भेट दिली. मृत महिलेचे शनिवारी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूच्या कारणांचा अधिक खुलासा पोलिसांकडून अपेक्षित आहे. यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने गावातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

आरोपीकडूनच फुटले बिंग

पीडित महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह आरोपीने स्वतःच्याच घरात रजईत गुंडाळून लपवून ठेवला होता. यानंतर तो दारूच्या नशेत सायंकाळी पोलिस ठाण्याकडे फिरत असताना अनावश्यक बडबड करीत होता. या बडबडीत माझ्या घरात ती महिला पाय घसरून पडली अन् मेली, असेही तो बोलून गेला. परिसरात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने त्याला थांबवून ठेवत त्याच्या बडबडीची दखल घेतली आणि आरोपीच्या घरी जाऊन शोध घेतला. प्रथमत: त्याला महिला दिसली नाही. तथापि, घरातील गादी आणि रजई खाली पडलेली दिसली. पोलिस कर्मचाऱ्याने ती रजई, गादी सरकवून बघताच महिलेचा मृतदेह दिसून आला आणि लागलीच पोलिसांची धावपळ सुरू झाली. पोलिस बंदोबस्तात वाढ केली गेली.

कापडाने गळा घोटला

आरोपी विशाल हा मद्याच्या अमलात राहतो, तर मृत महिला एका पायाने अधू होती. कुबड्यांच्या साहाय्याने घरोघरी जाऊन किरकोळ कामे करून ती उदरनिर्वाह करायची. आरोपीने तिला घरी बोलावून कार्यभाग उरकविला आणि त्यानंतर कापडाने गळा घोटला. यातच ती ठार झाली, अशी सूत्रांची माहिती आहे.

तीन दिवसांची पोलिस कोठडी

आरोपीस पथ्रोट पोलिसांनी शनिवारी अचलपूर न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने आरोपीस २९ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

 

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. आम्हांला शवविच्छेदन अहवालासह वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.

- सचिन जाधव, ठाणेदार, पथ्रोट.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी