शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
2
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
3
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
4
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
5
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
6
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
7
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
8
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
9
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
10
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
11
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
12
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
13
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
14
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
15
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
16
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
17
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
18
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
19
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे
20
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले

उत्कृष्ट कार्याला कौतुकाची थाप

By admin | Updated: May 2, 2016 00:08 IST

गुन्हे उघडकीस आणण्याबरोबर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तीन पोलीस निरीक्षकांसह ६२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना रविवारी सन्मानित करण्यात आले.

६२ पोलिसांना प्रशस्तीपत्र : आयुक्तांच्या हस्ते वितरणअमरावती : गुन्हे उघडकीस आणण्याबरोबर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तीन पोलीस निरीक्षकांसह ६२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना रविवारी सन्मानित करण्यात आले. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक गणेश अणे यांना ११ गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल तर गुन्हे शाखेचे निरीक्षक डी.एम. पाटील यांना वाहन चोरी, चेनस्रॅचिंग व मुस्कान आॅपरेशनमध्ये चांगले काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले. वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस आयुक्त बळीराम डाखोरे यांनी अल्पकालावधीत २७८० वाहनधारकांवर कारवाईचा दंडूका उगारला तर गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी अत्यंत क्लिष्ट असे २० गुन्हे उघडकीस आणल्याने ते प्रशस्तीपत्रांसाठी पात्र ठरले. याशिवाय वाचक शाखेतील सहपोलीस निरीक्षक निळकंठ कुकडे, सहायत पोलीस निरीक्षक दत्ता देसाई (गुन्हे शाखा), उपनिरीक्षक पंकज कांबळे, उपनि. पि.जे. वेरुळकर, उपनि. प्रवीण पाटील, उपनि. निर्मला भोईल, उपनि. प्राजक्ता धावडे, महिला उपनिरीक्षक आरडी चव्हाण, उपनि. जितेंद्र ठाकूर, उपनि. प्रशांत लभाणे, उपनि. गणेश अहिरे, सहाय्यक उपनि. अशोक मांगलेकर, याअधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांचे मनोबल वाढविलेअमरावती : याशिवाय चद्रशेखर दोडके, प्रकाश ठाकरे, शरचंद्र खंडारे, बाळासाहेब वाघमारे, सुरेश वानखडे, जानराव देहाडे, लता उईके, संध्या नेहारे, शिवाली भारती, प्रमोद भुसारे, संग्राम भोजने, बन्सी भटकर, प्रवीण बुंदेले, गजानन सहारे, संजय देऊळकर, राजेश गुलालकर, राम गावनेर, राजू भेंडे, नरेंद्र ढोबळे, शंकर भगत, कमलेश शिंदे, प्रदीप ठाकरे, गजानन विधाते, अजय कोठे, विनय मोहोड, सतीश देशमुख, निखिल माहोरे, विजय ढोके, संजय कोहळे, सुनील विधाते, प्रवीण थोरवे, सागर, सारंग, उज्ज्वला सुर्वे, राजेश यादव, पूनम (१०८५), पल्लवी (१८८९) विजय देशपांडे, चेतन (१७५८), घनश्याम यादव, विनोद (१७७३), प्रेमदास मोहोड आणि वरिष्ठ लिपीक शेंडे या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. (प्रतिनिधी)डाखोरेंची उत्कृष्ट कामगिरीशहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त बळीराम डाखोरे यांनी वाहतूक नियमनासंदर्भात उत्कृष्ट कामगिरी केली. राजापेठ विभागाचे वाहतूक निरीक्षक म्हणून रेकॉर्ड ब्रेक २७८० वाहनांवर कारवाई केल्याने त्यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रशस्तीपत्राने गौरविण्यात आले. २० गुन्हे उघडकीस आणणारे कांचन पांडेनागपुरी गट, शहर कोतवालीनंतर गुन्हे शाखेतही छाप सोडणारे सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी तब्बल २० गुन्हे उघडकीस आणले आहेत. सायबर सेलचे प्रमुख म्हणून पांडे यांनी सूक्ष्म तांत्रिक तपास केल्याने गुन्हे शाखेच्या कामगिरीत मोलाची भर पडली. ते तांत्रिक तपासातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.