शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:51 IST

लोकसभा निवडणूक व याच काळातील सण-उत्सवांदरम्यान उत्कृष्टरीत्या कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पोलीस आयुक्त व तिन्ही पोलीस उपायुक्तांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

ठळक मुद्देनिवडणूक शातंतेत पार पाडण्यात मोलाचे योगदान : आयुक्तांसह तिन्ही उपायुक्तांच्या हस्ते सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणूक व याच काळातील सण-उत्सवांदरम्यान उत्कृष्टरीत्या कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पोलीस आयुक्त व तिन्ही पोलीस उपायुक्तांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.निवडणुकीदरम्यान सण-उत्सव असल्याने कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करून लोकसभा निवडणूक अत्यंत शांततेत व कुठलेही गालबोट लागू न देता पार पाडली. त्यामुळे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. यामध्ये पोलीस ठाण्यांचे खुपिया कर्मचारी, पोलीस ठाण्यांचे गुन्हे अन्वेषण पथकाचे कर्मचारी, गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी, विशेष शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल, बिनतारी संदेश विभाग, मोटर परिवहन विभाग, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार पोलीस आयुक्तांनी केला. सर्व सहायक पोलीस आयुक्तांचासुद्धा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी पोलीस आयुक्तांनी मनोगत व्यक्त केले. यापुढेही असेच टीम वर्क पोलीस अधिकारी-कर्मचारी करतील, अमरावती पोलीस आयुक्तालयाचे नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून केली. यावेळी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव व पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे व आभार प्रदर्शन विशेष शाखा पोलीस निरीक्षक नीलिमा आरज यांनी केले.हे आहेत सत्कारमूर्तीसत्कारमूर्तींमध्ये पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव, प्रदीप चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त भोसले, रणजित देसाई, बळीराम डाखोरे, गुन्हे शाखेचे पीआय कैलास पुंडकर, आर्थिक गुन्हे शाखेचे पीआय पंजाब वंजारी, सायबरचे पीआय दिलीप चव्हाण, एपीआय कांचन पांडे, वाहतूक शाखेचे पीआय अशोक लांडे, राहुल आठवले, मोटार परिवहन विभागाचे पीआय राजेंद्र तावरे, प्रशासन विभागातील पीआय अनिल कुरळकर, विशेष शाखेच्या पीआय नीलिमा आरज, बिनतारी संदेशचे देशमुख, बडनेरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी, पोलीस नाईक राहुल (८७५), पोलीस कॉन्स्टेबल चेतन (ब.न.१५६५), फ्रेजरपुºयाचे पीआय आसाराम चोरमले, एपीआय बिपीन इंगळे, पीएसआय बालाजी लालपालवाले, मंठाळे, पावेल बेले, एएसआय अटाळकर, पोलीस हवालदार बापूराव खंडारे, विनय गुप्ता, नांदगाव पेठचे पीआय गोरखनाथ गांगुर्डे, पोलीस हवालदार राजेंद्र (बं.न.८५३), पोलीस नाईक संजय (ब.न. ११५६), सतीश (ब.न.६७), राजापेठचे पीआय किशोर सूर्यवंशी, एपीआय गजानन मेहेत्रे, पीएसआय मापारी, नरवाडे, पोलीस हवालदार राजेश राठोड, अशोक वाटाणे, रंगराव जाधव, फिरोज खान, दिनेश भिसे, राजेश गुरुले, राहुल ढेंगेकर, अमोल खंडेझोड, प्रेम रावत, अनिल सावरकर, अतुल संभे, लासूरकर, कोतवालीचे पीआय शिवाजी बचाटे, अतुल घारपांडे, पीएसआय राजमल्लू, मुंडे, एएसआय राजेंद्र उमप, अब्दुल कलाम, उमाकांत आसोलकर, पंकज (ब.न.५५६), भगत (१६०८), खोलापुरी गेटचे पीआय पुंडलीक मेश्राम, पीएसआय काठेवाडे, एएसआय दिलीप राणे, पोलीस हवालदार सुभाष माने, आनंद तायडे, लक्ष्मण सातखेडे, राहुल थोरात, भातकुलीचे पीआय विजय वाकसे, पीएसआय दाभाडे, पोलीस हवालदार गजानन खुरकटे, रहिम खान, अजय तायडे, गाडगेनगरचे पीआय मनीष ठाकरे, रवींद्र देशमुख, एपीआय दत्ता देसाई, पीएसआय बालाजी पुंड, शंकर डेडवाल, विनोद धाडसे, नागपुरी गेटचे पीआय अर्जुन ठोसरे, वलगावचे पीआय मोहन कदम यांचा समावेश होता.

टॅग्स :Policeपोलिस