शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आधी बारावीची परीक्षा, नंतर पित्याला भडाग्नी; मलकापूर परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:55 IST

शेंदूरजनाघाट येथील मलकापूर परिसरातील योगेंद्र दुपारे हा बारावीचा विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत असताना अचानक वडिलांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. तथापि, शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये, ही वडिलांची शिकवण होती. त्यासाठीच काबाडकष्ट घेत असलेल्या वडिलांच्या प्रेरणेतून योगेंद्रने पेपर सोडविला आणि परतल्यानंतर वडिलांना भडाग्नी दिला.

ठळक मुद्देवडिलांची प्रेरणा : दु:खातही कर्तव्याला दिले स्थान

वरूड : शेंदूरजनाघाट येथील मलकापूर परिसरातील योगेंद्र दुपारे हा बारावीचा विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत असताना अचानक वडिलांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. तथापि, शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये, ही वडिलांची शिकवण होती. त्यासाठीच काबाडकष्ट घेत असलेल्या वडिलांच्या प्रेरणेतून योगेंद्रने पेपर सोडविला आणि परतल्यानंतर वडिलांना भडाग्नी दिला.शेंदूरजनाघाट येथील मलकापूर परिसरात वास्तव्यास असलेल्या मनोहर दुपारे यांनी अठराविश्वे दारिद्र्यातही मुलाला चांगले शिक्षण देण्याचा चंग बांधला. दुपारे दाम्पत्याने शेतमजुरी करून योगेशला बारावीपर्यंत शिकविले. यादरम्यान मनोहर दुपारे यांना कर्करोग जडला. मात्र, उपचाराची तमा न बाळगता त्यांनी योगेंद्रला शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली. बारावीची परीक्षा सुरू झाली असताना २६ फेब्रुवारीला सकाळी मनोहर दुपारे यांचे निधन झाले. ११ वाजता पेपर होता. पेपर दिला नाही, तर वर्ष वाया जाईल, शिक्षणाचा खेळखंडोबा होईल, या विचाराने योगेंद्रने आधी परीक्षा केंद्रावर पेपर सोडविला. दुपारी ४ वाजता वडिलांच्या चितेला त्याने भडाग्नी दिला. यावेळी शिक्षकांनी योगेंद्रला सावरण्यासाठी मदत केली तसेच विविध सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. समाजप्रबोधन मंचचे अध्यक्ष प्रवीण चौधरी, जायन्ट्सचे अध्यक्ष योगेश्वर खासबागे, अश्वपाल वानखडे, यशपाल जैन आदींनी दुपारे कुटुंबाला मदत केली.

टॅग्स :examपरीक्षाDeathमृत्यू