अमरावती : ‘क्यार’ आणि ‘महा’ चक्रीवादळ, दुष्काळी भागातील ३४ जिल्ह्यांतील ३४९ तालुक्यांतील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची शाळांकडून ऑनलाईन माहिती मागविली आहे. अमरावती विभागात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
राज्यात सन २०१९- २०२० मध्ये ‘क्यार’, आणि ‘महा’ चक्रीवादळ तर, सन २०१७-२०१८ व २०१८-२०१९ वर्षात टंचाईग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती केली जाणार आहे. शासनाने अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा शु्ल्काची रक्कम शिक्षण मंडळाकडे जमा केली आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या पात्र विद्यार्थी अथवा पालकांंच्या खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाणार आहे. त्याकरिता विद्यार्थांची ऑनलाईन माहिती शाळांना पाठवावी लागणार आहे. यापूर्वी काही विद्यार्थ्यांना लाभ मिळाला असून, त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. मात्र, अद्यापही काही विद्यार्थी परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती होणे बाकी आहे. अशा विद्यार्थांची ऑनलाईनद्धारे बँक खात्याची माहिती मागविली आहे.
---------------
अमरावती विभागातील दुष्काळ भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार अशा विद्यार्थांची ऑनलाईन माहिती शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर पाठविण्याचे कळविले आहे. ३२५ ते ३५० रुपये विद्यार्थी अथवा पालकांच्या खात्यात जमा होतील.
- शरद गोसावी, अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ