शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

दरवर्षी पाच लाख पर्यटक अमरावती जिल्ह्यात

By admin | Updated: June 26, 2015 00:33 IST

निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी ५ लाखांवर पर्यटक अमरावती जिल्ह्यात येतात.

वैभव बाबरेकर अमरावतीनिसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी ५ लाखांवर पर्यटक अमरावती जिल्ह्यात येतात. साधारणत: हिवाळा व पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अमरावती जिल्हा सर्व दृष्टीने समृध्द आहे. जिल्ह्यातील निसर्गरम्य वातावरण व धार्मिक स्थळे पाहण्याकरिता देशा-विदेशातूनही पर्यटक अमरावती जिल्ह्यात येतात. साधारणत: पावसाळ्यापासून पर्यटकांची धूम जिल्ह्यातील विविध ठिकाणी पहायला मिळते. विदर्भातील नंदनवन असणारे मेळघाट व चिखलदरा थंड हवेचे ठिकाणी म्हणून महाराष्ट्रभर प्रसिध्द आहे. त्यामुळे दरवर्षीच चिखलदरा व मेळघाटात पर्यटकांची मोठी गर्दी राहते. पाऊस पडताच निसर्गरम्य वातारवण पाहण्यासारखे असते. त्यातच पावसामुळे जलस्त्रोत तुंडूब भरतात. अशावेळी नद्याही ओसंडून वाहू लागतात. त्यातच धबधब्यांची दृश्ये पाहण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. चिखलदऱ्यातील हील स्टेशन, पंचबोल पॉइंन्ट, गावीलगड, देवी पॉइंट, नरनाळा अभयारण्य, गुगामल नॅशनल पार्क, वाण अभयारण्य, मेळघाट टायगर रिजर्व्ह, सेमाहोड, कोलकास अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. दरवर्षी सुमारे ५ लाखांवर पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवर येत असून लाखोंचा महसूलसुध्दा प्रशासनाच्या तिजोरीत जमा होत आहे. धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दीजिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामध्ये मुख्यत: अमरावती शहरातील अंबादेवी व एकवीरा देवीचे मंदिर आहे. दरवर्षी देशभरातून अनेक भाविक तेथे दर्शनासाठी येतात. त्यातच आमनेर महादेव मंदिर, बहिरम, इस्कॉन मंदिर, सतीधाम मंदिर, वैराग्य देवी मंदिर असे अनेक धार्मिळ स्थळांवर पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. मुक्तागिरीचे मंदिर विशेष आकर्षणअमरावती जिल्ह्याच्या शेजारीच मध्य प्रदेशात मुक्तागिरीचे भव्यदिव्य मंदिर आहे. निसर्गरम्य वातावरण वसलेले हे जैन मंदिर विदर्भातील पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे. मुक्तागिरी मंदिरात जाण्यासाठी बहुतांश पर्यटकांना अमरावती जिल्ह्यातूनच जावे लागते. त्यामुळे महाराष्ट्रातही मुक्तागिरी धार्मिक स्थळ नामाकिं त आहे. दरवर्षी जिल्ह्यातील हजारो नागरिक मुक्तागिरीला जात असल्याचे पर्यटकांकडून सांगण्यात येत आहे.