शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा, टिपेश्र्वर अभयारण्याला पर्यटकांची पसंती; दऱ्या, खोऱ्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे पाठ

By गणेश वासनिक | Updated: March 27, 2023 19:14 IST

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असताना सुद्धा ताडोबा-अंधारीत वाघांना बघण्यासाठी पर्यटक वेटिंगवर असतात

अमरावती: राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असताना सुद्धा ताडोबा-अंधारीत वाघांना बघण्यासाठी पर्यटक वेटिंगवर असतात. मात्र महाराष्ट्रातील मेळघाट, सह्यांद्री व्याघ्र प्रकल्पाकङडे पर्यटक पाठ फिरवित आहे. वाघांची संख्या कमी असल्याचा अनुभव पर्यटकांना याठिकाणी मिळत असून दऱ्या, खोऱ्यांमुळे सुद्धा मेळघाटकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे वास्तव आहे. उन्हाळ्याचा हंगाम सुरु झाल्याने पर्यटकांची पाऊले जंगलाच्या दिशेने वळली आहे.

 महाराष्ट्रात मेळघाट, ताडोबा, नवेगाव-नागझिरा, बोर, सह्याद्री, पेंच असे एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहे. यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प २५०० चौरस मीटर आणि सर्वात मोठा असताना मेळघाटात केवळ ५५ वाघांचे अस्तित्व दिसून येते. मात्र विदर्भातील पेंच, मेळघाट, बोर, नवेगाव बांध या राष्ट्रीय उद्यानाला मागे सोडत ताडोबा-अंधारीने उच्चांक गाठलेला आहे. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही लाखांवर पोहोचलेली असून या खोलाखाल टिपेश्वर अभयारण्यात केवळ १० वाघ असताना दुसऱ्या क्रमांकाची पसंती या टिपेश्वरला मिळत आहे. येथे १ जानेवारी ते २५ मार्च २०२३ पर्यंत ४० हजार तर ताडोबात एक लक्ष पर्यटकांना वाघ दिसल्याने या दोन जंगलाची चर्चा कमालीची वाढलेली आहे.

मेळघाट का मागे पडलेमेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार मोठा आहे. या व्याघ्र प्रकल्पाला मुख्य वनसंरक्षक दर्जाचा अधिकारी व ३५ वनपरिक्षेत्र असताना हवे तसेच पर्यटन या ठिकाणी होताना दिसून येत नाही. गेल्या १७ वर्षांपासून मेळघाटात केवळ ५५ ते ६० वाघांचे अस्तित्व टिकून आहे. कारण डोंगर, दऱ्या, खोऱ्यांचे हे जंगल वाघांच्या प्रजननासाठी अनुकुल नसल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगतात. वाघ दिसत नसल्याने मेळघाटात वर्षभरात केवळ २० ते २५ हजार पर्यटकांनी भेट दिलेली आहे, हे विशेष. टिपेश्वर अभयारण्यात हमखास दिसतो वाघताडोबानंतर सर्वाधिक पर्यटक खेचणारे टिपेश्वर अभयारण्य अत्यंत लहान आहे. मात्र याठिाकणी ताडोबातून ये-जा करणारे वाघ पर्यटकांना खुणावत आहे. केवळ १० वाघांच्या भरोशावर या अभयारण्याने मेळघाटला मागे साेडले आहे. या ठिकाणी लाखो पर्यटक भेटी देत आहेत. केवळ दोन प्रवेशद्वारावरुन पर्यटकांना आता शिरण्याची मुभा असून हमखास वाघ या ठिकाणी दिसत असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर महाराष्ट्राच्या तेलंगणा नकाशावर झळकत आहे. 

 

टॅग्स :Amravatiअमरावती