शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

-ही तर आरोग्य यंत्रणेची दडपशाहीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:28 IST

खासगी पॅथॉलॉजी व खासगी डॉक्टरांकडून डेंग्यूबाबतच्या ‘रॅपिड व अन्य प्राथमिक चाचण्या’ जिल्हा आरोग्य यंत्रणेने ‘अनकन्फर्मेटिव्ह’ (अविश्वसनीय) ठरविल्याने डॉक्टरांमधून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देडॉक्टरांचा सूर तीव्र : डेंग्यूच्या चाचण्यांवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खासगी पॅथॉलॉजी व खासगी डॉक्टरांकडून डेंग्यूबाबतच्या ‘रॅपिड व अन्य प्राथमिक चाचण्या’ जिल्हा आरोग्य यंत्रणेने ‘अनकन्फर्मेटिव्ह’ (अविश्वसनीय) ठरविल्याने डॉक्टरांमधून संताप व्यक्त होत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार निदान करण्यात आलेल्या रुग्णांना बाधित संबोधायचे नाही काय, अशी विचारणा डॉक्टरांकडून होत आहे.केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाºया ‘नॅशनल हेल्थ पोर्टल’वर डेंग्यू एनएस वन अ‍ॅन्टीजेन ही चाचणी डेंग्यू तापाच्या निदानासाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट ही अ‍ॅन्टी डेंग्यू तपासणीची विशिष्ट पद्धत असल्याचेही केंद्रीय आरोग्य खाते मान्य करते, तर एका खासगी डॉक्टरकडे दाखल असलेल्या रुग्णांच्या संबंधित टेस्ट पॉझिटिव्ह आल्या असताना आपण कुठल्या वैद्यकशास्त्रानुसार डेंग्यूचे निश्चित निदान केले, अशी विचारणा केली जाते, असा सवाल डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. ही विचारणा नव्हे, तर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची दडपशाही असल्याची प्रतिक्रिया खासगी डॉक्टरांमध्ये उमटली आहे.डेंग्यूबाधितांची खरी आकडेवारी समाजासमोर येऊन जिल्हा आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली जाता कामा नये, यासाठीच सरकारी यंत्रणेकडून यवतमाळच्या सेंटिनेल सेंटरमधून येणाºया अहवालाचा बागूलबुवा केला जात असल्याचा आरोप यानिमित्ताने होऊ लागला आहे. डेंग्यूची साथ अधिक झपाट्याने पसरु नये, लोकांनी खबरदारी घ्यावी यासाठी माध्यमांना डेंग्यू पॉझिटिव्हबाबत माहिती देण्यात आली. यात खळबळ किंवा पॅनिक परिस्थिती निर्माण करण्याचा हेतू नव्हता. तथापि खासगी पॅथॉलॉजीतील रिपोर्ट डेंग्यूच्या निदानाकरिता ग्राह्य धरता येणार नाही, असा दावा जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी व जिल्हा हिवताप अधिकारी करतात. खासगी डॉक्टरांनी स्थानिक आरोग्य प्रशासनाचे आदेश ग्राह्य धरायचे की, केंद्र शासनाच्या गाईडलाईननुसार डेंग्यू संशयितांचे निदान करायचे, अशी संभ्रमावस्था जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांमध्ये निर्माण झाली आहे.डेंग्यूच्या अचूक निदानासाठी यवतमाळचे सेंटिनल सेंटरमधून तपासणी करुन आलेल्या रक्तजलनमुन्यांचा अहवाल जर डेंग्यू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ठरवत असेल तर डेंग्यू निदानासाठी केंद्र शासनाकडून मान्य करण्यात आलेली एनएस १ अ‍ॅन्टीजेन स्थानिक आरोग्य प्रशासनाला मान्य नाही काय ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. डेंग्यूच्या निदानासाठी केंद्र आजाराच्या पहिल्या आठवड्यात डेंग्यूच्या निदानासाठी डेंग्यू एनएस अ‍ॅन्टीजेन ही टेस्ट उपयुक्त ठरत असल्याचे ‘नॅशनल हेल्थ पोर्टल’ (एनएचपी)वर स्पष्ट करण्यात आले आहे. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्या रुग्णांना डेंग्यू पॉझिटिव्ह म्हटल्याचा दावा डॉ. निचत यांनी केला होता. त्यांना महापालिकेतर्फे खुलासा मागविण्यात आला होता.रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट ही योग्य प्रणालीरॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट ही विशेष रुपाने अँटीडेंग्यू आयजीजी आणि आयजीएम अँटीबॉडीची तपासणी करण्यासाठी एक योग्य प्रणाली असल्याचे नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. डॉ.निचत यांनीसुद्धा त्यांच्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची डेंग्यू आयजीएम टेस्ट केली होती. ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी डेंग्यू पॉझिटिव्हचा दावा केला होता.