शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

पुत्रवियोगानंतरही ‘त्या’ माऊलीने जपले समाजभान!

By admin | Updated: July 30, 2016 00:02 IST

मातृहृदय प्रचंड हळवे असते म्हणतात. आईचा जीव तिच्या मुलांमध्येच गुंतलेला असतोे.

रूढी-परंपरांना फाटा : गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटपअमरावती : मातृहृदय प्रचंड हळवे असते म्हणतात. आईचा जीव तिच्या मुलांमध्येच गुंतलेला असतोे. मुलाच्या वियोेगाचे दु:ख पचविण्याची वेळ एखाद्या आईवर आली तर ती कोलमडून पडते. पण, येथील एका माऊलीने मात्र, पुत्रवियोगानंतरही सामाजिक भान कायम ठेवले आणि मुलाच्या स्मृतिदिनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा अनोखा पायंडा पाडला. नलिनी किशोर तायडे असे या दु:खी माऊलीचे नाव आहे. स्थानिक चपराशीपुऱ्यात त्यांचे घर. चांदूररेल्वे तालुक्यातील कृषी विभागामध्ये त्या शिपाई पदावर कार्यरत आहेत. आर्थिक स्थितीही बेताचीच. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. पदरी दोन मुले व मुलगी. परंतु नियती एवढ्यावरच थांबली नाही. सर्व काही सुरळीत सुरू असताना त्यांचा मोठा मुलगा धीरज याला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. उपचार केलेत. परंतु त्याने या जगाचा निरोप घेतला. पतीनिधनाचे दु:ख पचवून कशीबशी सावरलेली ही माऊली पुन्हा कोलमडून पडली. जगण्याचा आधारच निघून गेला. परंतु मुळातच खंबीरपणा अंगी असल्याने त्यांनी स्वत:ला सावरले. थरथरणाऱ्या पावलांनी त्या पुन्हा उभ्या ठाकल्यात. कुटुंबाला धीर दिला. समाजासमोर ठेवला आदर्शअमरावती : नलिनीताई दरवर्षी २५ जुलै रोजी मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ चपराशीपुऱ्यातील महिंद्र विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि वह्या-पुस्तकांचे वाटप करतात. समाजात स्वत:ची इवली-इवली दु:खे वर्षानुवर्षे कुरवाळत बसणारे अनेक लोक आपण अवतीभवती पाहतो. पण, दु:खाच्या कोषातून बाहेर पडून दुसऱ्यांचे दु:ख जाणून समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या नलिनीताई या विरळ्याच. नलिनीतार्इंचा ‘धीरज’ कॅन्सरने ओढून नेला असला तरी त्याच्या स्मृती आणि मुलगी तसेच धाकटा मुलगा स्वप्नील यांच्या आधाराने त्या आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या देखील धिरोदात्तपणे पेलत आहेत. (प्रतिनिधी)इतरांनी घ्यावा आदर्शआधी पतीचे निधन आणि मग जगण्याचा आधार असलेला मुलगा गमावल्यानंतरही नलिनीताई खंबीर राहिल्या. नेटाने त्यांनी संसार रेटला. फारसे शिक्षणही नाही आणि आर्थिक स्त्रोतही बळकट नाहीत. पण, समाजासाठी काही तरी करण्याची ईच्छा मात्र प्रबळ. त्यामुळेच कर्मकांडाला फाटा देऊन गरजू विद्यार्थ्यांना जमेल तसे शालेय साहित्य पुरविण्याचा पायंडा त्यांनी पाडला आहे. दरवर्षी मुलाच्या स्मृतीदिनी त्या हा उपक्रम राबवितात.