शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षांचे मूल्यांकन सुरू; मुख्याध्यापकांच्या नावे कस्टडीतून पेपर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 18:18 IST

शिक्षण मंडळाकडे ११ मार्चपासून येणार तपासून 

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागात इयत्ता बारावीच्या परीक्षांंचे मूल्यांकन युद्धस्तरावर सुरू आहे. शिक्षण मंडळाकडे हे पेपर ११ मार्चपासून गुणनियंत्रणाअंती येतील, अशी माहिती आहे.

इयत्ता बारावीच्या परीक्षांना १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. त्यानंतर वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, शिक्षण मंडळाच्या निर्णयानुसार जिल्हानिहाय कस्टडीतून थेट मुख्याध्यापकांच्या नावे हे पेपर पाठविले जात आहे. कस्टडीतून पेपर जाताना अत्यंत गोपनीय पद्धतीने बारकोड लावले जात आहे. सदर पेपर कोणत्या शाळा, महाविद्यालयातील आहेत, हे मुख्याध्यापक, शिक्षकांना कळू शकत नाही.

मूल्यांकनाची प्रक्रिया अतिशय गोपनीय आणि बारकोड प्रणालीद्वारे होत असल्याची माहिती आहे. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात मूल्यांकनानंतर ते पेपर गुणनियंत्रकांकडे पाठविले जातात. त्यानंतर गुणनियंत्रक हे पेपर पुढे गुणनियंत्रणासाठी पाठवितो. मूल्यांकनाचा असा प्रवास पूर्ण झाल्यानंतर ते पेपर निश्चित वेळापत्रकानुसार शिक्षण मंडळाकडे पाठविले जातात.

बारावी परीक्षांचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर वेळापत्रकानुसार ११ मार्चपासून शिक्षण मंडळाकडे पेपर पाठविणे बंधनकारक आहे. बारावीच्या परीक्षा  १८ मार्चपर्यंत चालणार आहे. अमरावती विभागात १ लाख ५१ हजार ३९२ परीक्षार्थींची नोंद झाली आहे. यात अकोला जिल्हा- २७३२१, अमरावती- ३०३०७, बुलडाणा- ३२५३४, यवतमाळ - ३३६८१, वाशीम- १९५४९ अशी विद्यार्थ्यांची संख्या आहे.      कस्टडीला पोलिसांचे सुरक्षा कवच

बारावी परीक्षांच्या मूल्यांकनासाठीच्या पेपरला पोलीस कस्टडीत ठेवण्यात येते. जिल्हानिहाय कस्टडी निर्माण केलेली असून, कोणते पेपर कोठे पाठवायचे, ही सर्व प्रणाली गोपनीय आहे. पोलीस सुरक्षा कस्टडी कक्षाला २४ तास राहत असल्यामुळे येथे कार्यरत कर्मचारीसुद्धा पोलीस निगराणीत कर्तव्य बजावतात, हे विशेष.     पोलीस कस्टडीत असलेले पेपर हे अतिशय गोपनीय पद्धतीने मुख्याध्यापकांच्या नावे पाठविले जातात. विद्यार्थी, गाव, शाळा, जिल्हा, असा कोणताही उल्लेख मूल्यांकनदरम्यान परीक्षकांना दिसत नाही. वेळेत मूल्यांकनासाठी नियोजन केले आहे. - शरद गोसावी, अध्यक्ष, शिक्षण मंडळ, अमरावती विभाग

टॅग्स :examपरीक्षाAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र