लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : काटआमला गावानजीक नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले बुधवारी रात्री वाहून गेले होते. धनश्रीचा मृतदेह गुुरुवारी सापडला, तर तब्बल ४० तासानंतर गाळात फसलेला नैतिकचा मृतदेह शोधपथकाच्या हाती लागला. या दोघांवर शुक्रवारी बहाद्दरपूर या त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.बहाद्दरपूर येथील जगदीश चौरे, मुलगी धनश्री, मुलगा नैतिक व वडील मारुती यांची दुचाकी काटआमलाच्या नाल्यावरून वाहणाºया पाण्यात स्लीप झाल्याने चौघेही नाल्यात पडले. यात जगदीश चौरे यांची दोन्ही मुले वाहून गेले. दुसºया दिवशी मुलीचा मृतदेह दोन किलोमीटर अंतरावर पाण्यातच आढळून आला. मात्र, बराच शोध घेऊनदेखील सात वर्षाच्या नैतिकचा मृतदेह आढळला नाही. शुक्रवारी सकाळी ९ वाजता शोधपथकाने शोधमोहीम पुन्हा सुरू केली. दुपारी १२ वाजता नैतिकचा मृतदेह शंभर मीटरवर मध्यभागी पाण्यात आढळून आला. उशिरा रात्री नैतिकच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार पार पडले.पालकमंत्र्यांकडून शोकसंवेदनाकाटआमला येथील दुर्घटनेत मुले गमावणाºया चौरे कुटुंबीयांबद्दल पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी शोकसंवेदना व्यक्त केल्या. याप्रसंगी कोंडेश्वरी नदीवरील पुलासह जिल्ह्यातील आवश्यक त्या सर्व पुलांची उंची वाढवावी तसेच तत्काळ सुरक्षा कठडे बसविण्याबाबत निर्देश ना. पोटे यांनी अधीक्षक अभियंत्यांना दिले. चौरे कुटुंबीयांना शासनाकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. पावसाळा लक्षात घेता, पूल व वाहतूक सुरक्षेबाबत आवश्यक दुरुस्त्या व सुविधा उभारण्याबाबत पालकमंत्र्यांकडून दोन महिन्यांपूर्वीही विभागाला स्पष्ट निर्देश देण्यात आलेत.जिल्हाधिकारी कार्यालयाचे पथक पोहोचलेजिल्हाधिकारी कार्यालयाचे शोध व बचाव पथक घटनेच्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पोहोचलेच नव्हते. तलाठी एस.एस. गिल, मनपाच्या फायर ब्रिगेडचे कर्मचारी, बडनेरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी नैतिकच्या शोधकार्यात झटत होते. तथापि, साहित्याअभावी त्यांना यश आले नाही. तब्बल तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाचे २५ जणांचे पथक बोट, जॅकेट व इतर साहित्यासह नैतिकचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरले. या पथकाने अवघ्या दोन तासांत नैसतिकचा मृतदेह शोधून काढला.
नैतिकचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:53 IST
काटआमला गावानजीक नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले बुधवारी रात्री वाहून गेले होते. धनश्रीचा मृतदेह गुुरुवारी सापडला, तर तब्बल ४० तासानंतर गाळात फसलेला नैतिकचा मृतदेह शोधपथकाच्या हाती लागला. या दोघांवर शुक्रवारी बहाद्दरपूर या त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
नैतिकचा मृतदेह सापडला
ठळक मुद्दे४० तास शोधमोहीम : दोघांवर बहाद्दरपूरमध्ये अंत्यसंस्कार