शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

11 सूत्रीद्वारे सहकारी संस्थांच्या कामाचे मूल्यमापन, उपाययोजना सूचविण्यासाठी दोन समित्यांचे गठन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 15:55 IST

 राज्यातील काही संस्थांमध्ये सहकारी कायदा, नियम, उपविधी याचे उल्लंघन झाल्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे या संस्थांच्या कामकाजाचे मूल्यमापन करून कामकाजात सुधारणा करण्यासाठी शासनाने दोन समित्यांचे गठन केले आहे.

अमरावती, दि. 12 - राज्यातील काही संस्थांमध्ये सहकारी कायदा, नियम, उपविधी याचे उल्लंघन झाल्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे या संस्थांच्या कामकाजाचे मूल्यमापन करून कामकाजात सुधारणा करण्यासाठी शासनाने दोन समित्यांचे गठन केले आहे. विहित 11 सूत्रीच्या आधारे या समित्या संस्थांच्या कामकाजाचे मूल्यमापन करून कामकाजात सुधारणा करण्यासाठी 60 दिवसांत शासनाला अहवाल सादर करणार आहेत.राज्यात सुमारे दोन लाख सहकारी संस्था कार्यरत आहेत.या संस्थांची सभासद संख्या सुमारे 5.5 कोटी इतकी आहे. यामध्ये सहकार क्षेत्रातील विविध कार्यकारी सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, यंत्रमाग सहकारी संस्था, सहकारी कृषी पणन् व प्रक्रिया संस्था, मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था, सहकारी पतसंस्था, सहकारी दूध उत्पादक संघ, औद्योगिक सहकारी संस्थेसह इतर सहकारी संस्थांचे राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. या सर्व सहकारी संस्थांचे कामकाज सहकारी संस्थांचे उपविधी, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना व शासनाच्या धोरणात्मक निर्णयाच्या आधारे होणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नसल्याने आता शासनाने दोन समित्यांचे गठन करून कामाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.यापैकी पहिली समिती कृषी पणन्चे संचालक आनंद जोगदंड व दुसरी ग्राहक महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे. या दोन्ही समित्या शासनाने विहित केलेल्या 11 सूत्रीच्या आधारे कामाचे मूल्यमापन करून 60 दिवसांत शासनाला अहवाल सादर करणार आहेत. सहकारी संस्थांनी सहकारी कायदा, नियम, उपविधीतील तरतुदी व शासनाच्या धोरणात्मक निर्णयाचे उल्लंघन केल्यामुळेच अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे यातील काही प्रमुख संस्थांच्या कामाचे मूल्यमापन करून गुणात्मक सुधारणेसाठी शासनाने आता यावर समितीचा उतारा शोधला आहे.याआधारे होणार संस्थांचे मूल्यमापनसंस्था स्थापनेचा उद्देश व पूर्तता कितपत झाली, अडचणी सोेडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, संस्थांच्या अर्थसहायाचा विनियोग व आतापर्यंतची वसुली, उल्लेखनीय कामकाज, सभासदांचे संस्थेच्या उन्नतीत योगदान, संस्थांमुळे झालेली रोजगार निर्मिती, कामातील त्रुटी, अनियमितता व गैरव्यवहार यावर करण्यात आलेली कारवाई, अवसायनातील संस्थांच्या पुनरूज्जीवनासाठी उपाययोजना, गुणात्मक वाढीसाठी उपाययोजना व यासाठी शासनस्तरावर करावयाचे धोरणात्मक निर्णय याआधारे मूल्यमापन होणार आहे.