शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना, माजी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षपदी

By गणेश वासनिक | Updated: February 23, 2024 22:11 IST

अमरावतीच्या डॉ.स्वाती शेरेकर यांची सदस्यपदी नियुक्ती 

गणेश वासनिक, अमरावती : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातंर्गत राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता राखून त्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच निरीक्षण पध्दत सुलभ करण्यासाठी राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या अध्यक्षपदी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचे सबलीकरण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या यशस्वीतेमुळे उच्च शिक्षणाची गुणवत्ता व पाया यांचे सबलीकरण करण्यासाठी एकछत्री योजना अभियान स्वरुपात राबविण्याकरिता केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ही योजना १२ व्या व १३ व्या पंचवार्षिक योजनांपासून राबविण्यात येत आहे. उच्च शिक्षणात गुणवत्ता, सर्वदूर संधी व समानता यावी यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षणा अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य प्रकल्प संचालनालयाची स्थापना करण्यात आली आहे.

यात अध्यक्ष म्हणून शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे . तर सदस्य म्हणून डॉ.भालचंद्र वायकर (संचालक इनोव्हेशन, इनक्युबेशन अॅण्ड लिकेजेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), डॉ.स्वाती शेरेकर (संचालक, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती), डॉ.विजय खरे (कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), राहुल म्हात्रे (सहसंचालक, रूसा मुंबई) यांचा समावेश आहे. शासन आदेशात कक्षाच्यावतीने करण्यात येणारी दहा कार्ये विशद करण्यात आली आहेत.’एनईपी’ची प्रभावी अंमलबजावणी करु : डॉ.येवले

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय कक्षाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली ही आनंदाची बाब आहे. माहिती, शिक्षण संवादाच्या माध्यमातून कक्षाचे काम अधिक प्रभावीपणे काम करण्यात येईल. उच्च शिक्षणात ’रिफॉम्स’ आणण्याचे दृष्टीने आगामी काळात कार्यरत राहील, अशी प्रतिक्रिया डॉ. येवले यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Amravatiअमरावती