शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:22 IST

राज्य शासनाने मराठी विद्यापीठ मुंबई येथे प्रस्तावित केले आहे. परंतु, मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे मराठीतील दोन्ही आद्य ग्रंथांचे लेखन झाले असल्याने याच ठिकाणी मराठी विद्यापीठ स्थापन करावे, ....

ठळक मुद्देमागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्य शासनाने मराठी विद्यापीठ मुंबई येथे प्रस्तावित केले आहे. परंतु, मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे मराठीतील दोन्ही आद्य ग्रंथांचे लेखन झाले असल्याने याच ठिकाणी मराठी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वात जि.प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना शनिवारी निवेदनाद्वारा केली.मराठीमधील आद्य गद्य ग्रंथ ‘लीळाचरित्र’ तसेच आद्य पद्य ग्रंथ ‘महदंबेचे धवळे’ यांचे लेखन रिद्धपूर येथे झाले. आद्य संशोधक, चरित्रकार माहिमभट्ट यांनी येथेच ‘वाजेश्वरी’ या स्थानावर शके १२०० मध्ये लीळाचरित्राची निर्मिती केली. या गं्रथामुळेच मराठीची ओळख झाली. ही मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे. येथेच महानुभावीय संतांनी लिखाण केले आहे. येथेच हजारोंच्या संख्येत हस्तलिखिते पूर्वजांचा वारसा म्हणून जतन केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही भेटीदरम्यान मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथेच होण्यास सहमती दर्शविली. मात्र, आता मराठी विद्यापीठ मुंबई येथे नेण्याचा घाट रचला जात आहे. हा महानुभावीय वाङ्मयावर व मराठी भाषिकांवर अन्यायकारक निर्णय असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी झेडपी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी केली. यावेळी जि.प.अध्यक्ष नितीन गोंडाणे उपस्थित होते.महानुभाव पंथीयांची काशी म्हणून रिद्धपूर हे गाव देशभर ओळखले जाते. या गावाचे महत्त्व लक्षात घेऊन व भाविकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना शासनाने करणे आवश्यक आहे.- दत्ता ढोमणे,उपाध्यक्ष, जिल्हा परिषद