शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

जिल्हा बँकेतील ३१ हजार खातेदारांच्या अर्जात त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 21:57 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : ज्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही अशा ७२,३३९ तात्पुरत्या अपात्र शेतकऱ्यांची यादी महाआॅनलाईनद्वारा मिसमॅच डाटा लिस्टच्या स्वरूपात बँकांना प्राप्त झाली आहे. यात सर्वाधिक ३१ हजार १७७ खातेदार जिल्हा बँकेचे, तर १३ हजार ८२६ खातेदार एसबीआयचे आहेत. संबंधित बँकेशी संपर्क करून त्रुटीची पूर्तता केल्यास खातेदारांना कर्जमाफीचा लाभ ...

ठळक मुद्देकर्जमाफीची प्रक्रिया : जिल्ह्यात ७२,३३९ अर्ज येलो लिस्टमध्ये

आॅनलाईन लोकमतअमरावती : ज्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही अशा ७२,३३९ तात्पुरत्या अपात्र शेतकऱ्यांची यादी महाआॅनलाईनद्वारा मिसमॅच डाटा लिस्टच्या स्वरूपात बँकांना प्राप्त झाली आहे. यात सर्वाधिक ३१ हजार १७७ खातेदार जिल्हा बँकेचे, तर १३ हजार ८२६ खातेदार एसबीआयचे आहेत. संबंधित बँकेशी संपर्क करून त्रुटीची पूर्तता केल्यास खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कल्याण योजनेंतर्गत दीड लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्याची कर्जमाफी केली आहे. यासाठी जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार ७९३ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज पोर्टलवर भरलेत. यातील तात्पूरत्या अपात्र ७२,३३९ शेतकऱ्यांची येलो लिस्ट पुन्हा संबंधित बँकांना पाठविण्यात आली. या सर्व याद्या संबंधित बँकांच्या शाखांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेकडून, सेवा सहकारी संस्थेकडून कर्ज घेतले आहे. त्या बँकेशी किंवा गटसचिवाशी संपर्क करून आवश्यक त्या माहितीची पूर्तता सात दिवसांच्या आत केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती पुन्हा पाठविणे बँकांना सोईचे होऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येईल. यामध्ये मोर्शी तालुक्यात ८,०४२, अंजनगाव सुर्जी ४,५९९, तिवसा ३,१४७, दर्यापूर ४,९४१, धामणगाव रेल्वे ५,८४२, चांदूर बाजार ४,९३०, भातकुली ४,०२१, अमरावती ७,६९८, चांदूर रेल्वे ३,८६७, अचलपूर ६,४२७, चिखलदरा ८६९, धारणी ४,२७६, वरूड ८,८९६ व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ४,७८४ अर्जात त्रुटी आहे. आतापर्यंत ९६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५०९ कोटींची कर्जमाफी वर्ग केलेली आहे. येलो लिस्टमधील काही शेतकऱ्यांची माहिती बँकांकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांची माहिती अपलोड झालेली नसल्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना पुन्हा शासनाने एक संधी दिली आहे.त्रुटी असणारे बँकनिहाय खातेदारयेलो लिस्ट बँकांना प्राप्त झाली, यामध्ये जिल्हा बँकेचे सर्वाधिक ३१,१७७ खातेदार, एसबीआय १३,८२६, बँक आॅफ महाराष्ट्र १२,३५९, आंध्रा बँक ५१, बँक आॅफ बडोदा ४१०, बँक आॅफ इंडिया ७६२, कॅनरा २०९, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ३४४, देणा बँक १,१७३, आयडीबीआय २४४, इंडियन बँक २१५, इंडियन ओव्हरशिज बँक १७५, पंजाब नॅशनल २४२, ओरिएंटल बँक १, युको बँक ६३, युनियन बँक १,५९३, विजया बॅक ८,एक्सिस बँक २४, एचडीएफसी बँक ४५१, आयसीआयसीआय २१६, रत्नाकर बँक २६ व विदर्भ ग्रामीण बँकेचे २९४ खातेदार आहेत.