शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

‘त्या’ वाघाची तिवसा तालुक्यात ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:30 IST

धामणगाव रेल्वे तालुक्यातून नरभक्षक वाघ तिवसा तालुक्यात दाखल झाला आहे. तालुक्यातील रघुनाथपूर शिवारात त्याने वासराची शिकार केल्याचे गुरुवारी निदर्शनास आले, शिवाय अनकवाडी शिवारात वाघाचे पगमार्क आढळले आहेत.

ठळक मुद्देरघुनाथपूर शिवारात वासराची शिकाररघुनाथपूर, अनकवाडी शिवारात आढळले पगमार्क, यशोमती ठाकूर घटनास्थळी

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : धामणगाव रेल्वे तालुक्यातून नरभक्षक वाघ तिवसा तालुक्यात दाखल झाला आहे. तालुक्यातील रघुनाथपूर शिवारात त्याने वासराची शिकार केल्याचे गुरुवारी निदर्शनास आले, शिवाय अनकवाडी शिवारात वाघाचे पगमार्क आढळले आहेत. दरम्यान, या भागापासून राष्ट्रसंतांचे गुरुकुंज अवघे पाच-सहा किलोमीटरवर असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आ. यशोमती ठाकूर यांनीही गुरुवारी तातडीने घटनास्थळ गाठले.मागील आठ दिवसांपासून नरभक्षक वाघाने धामणगाव रेल्वे तालुक्यात धुमाकूळ घातला. आधी मंगरूळ दस्तगीर व नंतर अंजनसिंगी येथे माणसांना खाल्लेल्या या वाघाने तिवसा तालुक्यातील कुºहा हद्दीत बुधवारी रात्री प्रवेश केला आणि रघुनाथपूर-भांबोरा पांदण रस्त्यावरील प्रभाकर वानखडे (रा. रघुनाथपूर) यांच्या शेतात झाडाला बांधलेले दोन वर्षांच्या वासराची शिकार केली. ही माहिती वनविभागाला शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी दिली. वनविभाग व तिवसा पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनाम्यानंतर आसपासच्या गावांमध्ये ‘अलर्ट’ दिला.इकडे वाघ, तिकडे बिबटअनकवाडी व रघुनाथपूर, मालधूर येथे नरभक्षक वाघाने एका वासराची शिकार केल्याने सारी यंत्रणा या ठिकाणी तळ ठोकून बसली होती, तर दुपारी २.१० वाजता वाघ वीरगव्हाण येथे शिरल्याचे फोन खणखणले. काळविटाला ठार केल्याची माहिती मिळताच यंत्रणा तेथे पोहोचली. तथापि, शिकार घेऊन पळ काढणारा तो बिबट असल्याची खात्री करण्यात आली.शार्प शूटर दाखलवाघाला बेशुद्ध करून पकडण्यासाठी बुलडाणा व अमरावती येथून दोन शार्प शूटर आणण्यात आले आहेत. त्यांना वाघाने केलेल्या शिकारीच्या परिसरात पिंजºयात बसविण्यात आले आहेत.बंदोबस्त तैनातवनविभागाचे अधिकारी राजेंद्र बोंडे यांच्या नेतृत्वाखाली ८० अधिकारी व कर्मचारी वाघाचा शोध घेत आहेत तसेच तिवसा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी घटनास्थळी पोलीस ताफ्यासह बंदोबस्त तैनात केला आहे. तहसीलदार डी.टी. पंधरे हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :Tigerवाघ