शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सखींनी घेतला श्रावण सोहळा कॉमेडी मेळ्याचा आनंद

By admin | Updated: August 24, 2015 00:32 IST

श्रावण महिना म्हणजे सणवार व्रतवैकल्याचा पवित्र महिना. कुमारिकेपासून तर सुवासिनींच्या आवडीचा तसेच नवविवाहितेपासून....

कलर्स चॅनल प्रस्तुत : अमरावतीतील सखींचा विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभागअमरावती : श्रावण महिना म्हणजे सणवार व्रतवैकल्याचा पवित्र महिना. कुमारिकेपासून तर सुवासिनींच्या आवडीचा तसेच नवविवाहितेपासून तर माहेरवासीयांच्या मनात कायम पिंगा घालणारा हा महिना उत्साह आणि पावित्र्याचा सुरेख मेळ घडवून आणणारा आहे. मंगळागौर, गौरी गणपती, श्रावण सोमवार, नागपंचमी, हरितालिका आदी सणांची तयारी घराघरांत केली जातात. या उत्सवातील आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी खास श्रावण सोहळ्याचे आयोजन अमरावती सखी मंचने नुकतेच संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे दीप प्रज्ज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून मेडिमिक्सचे टेरीटेरी सेल्स मॅनेजर संजय देशमुख, बिरला सन्सचे शाखा व्यवस्थापक योगेश पनबुडे, मोकलकर क्लासेस रीता मोकलकर, सेन्ट फ्रान्सीस स्कूलच्या प्राचार्य उज्ज्वला कुळकर्णी, नगरसेविका अर्चना इंगोले, अपर्णा देशमुख, परतवाडा, लोकमतचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, व्यवस्थापक देवेंन्द्र ठाकरे, व्यवस्थापक राजेश मालधुरे उपस्थित होते.श्रावण सोहळा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सखींसाठी विनोदी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. सखींनी एकापेक्षा एक सरस उखाणे म्हणून उपस्थितांमध्ये हास्य फुलविले. प्रथम क्रमांक अर्चना सपकाळ, द्वितीय अर्चना एरंडे, तृतीय माधुरी बोकारीया, चतुर्थ सुनीता डोंगरे, तर पाचवा क्रमांक लता जाधव यांनी पटकावला, कलर्स विनोदी उखाणे स्पर्धेत स्पर्धकांना बसण्यासाठी महाराजा खुर्चीचे आयोजन केले होते. कलर्स प्रस्तुत राखी थाळी सजावट व आपल्या भावाबद्दलचा हा प्रेमाचा धागा त्यांनी आणखी दृढ केला. राखी थाळी सजावटमध्ये प्रथम बक्षीस सुनीता डोंगरे तर द्वितीय बक्षीस मीना विधे यांनी पटकाविले. रांगोळी स्पर्धेत सखींनी निसर्ग चित्रास प्राधान्य दिले. विविध नैसर्गिक देखावे सखींनी रांगोळीतून साकारलीत. काहींनी मात्र स्त्री सुरक्षितता व सामाजिक विषयही रांगोळीतून साकारले. स्पर्धेच्या या शृंखलांमध्ये मेहेंदी स्पर्धासुद्धा घेण्यात आली. त्यामध्ये रेणुका गुडधे हिने प्रथम पारितोषिक प्राप्त केले, स्नेहा सोजवानी हिने द्वितीय पारितोषिक पटकावले. ईन्होवेटीव्ह मेडिमिक्स हर्बल फॅशन शोमध्ये एकापेक्षा एक सरस वेशभूषा करुन सखींनी पे्रक्षकांची मने जिंकलीत, निर्सगातील पाने, फुले, विविध कळ्यांनी युक्त असा फॅशन शो करुन सखींनी रसिकांना जाणीव करुन दिली. सखींनी पारंपरिक वेशभूषा व श्रावणाचा हिरव्या रंगछटेच्या पोशाखावर अधिक भर दिला. यामध्ये नेहा वैद्य हिला प्रथम क्रमांक तर प्रीती गवई यांना दुसरे बक्षीस प्राप्त झाले. फॅशन शो कोरीओग्राफर किरण भेले यांनी केला. यावेळी सखींसाठी वन मिनिट गेम शो स्पर्धेचे आयोजन केले होते. सखींनी विविध बक्षिसे पटकावली. कार्यक्रमाचे परीक्षक उज्ज्वला कुळकर्णी, रंजना लोकरीया, अश्विनी मेश्राम, अपर्णा देशमुख, रीता मोकलकर, जया पुंडकर व अमरीश तबस्सूम होत्या. यावेळी बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सकडून महिलांचे आर्थिक सशक्तीकरण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. श्रावण सरींच्या रिमझिम बरसातीत मंद श्रावण गीतांचा आस्वाद घेत सखींनी झुल्याचा मनमुराद आनंद लुटला. दिवसभर चाललेल्या या सोहळ्याला सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व कलर्स व मेडिमिक्सचे आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन अमरावती सखी संयोजिका स्वाती बडगुजर यांनी केले.