शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अखेरपर्यंत गजभिये शीतलसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:15 PM

शीतल पाटील हत्याकांडातील अटक आरोपी अ‍ॅड. सुनील गजभिये शीतलच्या अखेरच्या क्षणापर्यंत सोबत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. मात्र, शीतलने आत्महत्या केल्याच्या भूमिकेवर तो ठाम असल्याचे पोलिसांना आढळून आले.

ठळक मुद्देपोलिसांसमक्ष कबुली : आरोपीला २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

आॅनलाईन लोकमतअमरावती : शीतल पाटील हत्याकांडातील अटक आरोपी अ‍ॅड. सुनील गजभिये शीतलच्या अखेरच्या क्षणापर्यंत सोबत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. मात्र, शीतलने आत्महत्या केल्याच्या भूमिकेवर तो ठाम असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याला न्यायालयात २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस सूत्रानुसार, प्रकरणातील दुसरा आरोपी रहमान खां पठाण (३५, रा. ताजनगर) याच्या शोध पोलीस पथक घेत आहे. गुरुवारी सुनील गजभियेने न्यायालयात आत्मसमर्पण केल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आल्यावर त्याने सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. दीड वर्षांपासून शीतलसोबत त्याचा वाद होता. तो विकोपाला गेला होता. १३ मार्च रोजी शीतल व रहमानला कार (एमएच २७ एसी-६९४८) मध्ये घेऊन तो चांदूरबाजार रोडवर गेला होता. शीतल व रहमानने एका हॉटेलमध्ये जेवण केले. त्यावेळी गजभिये हा काही कामानिमित्त अर्धा तास दोघांपासून दूर गेला होता. परतल्यानंतर तिघेही कठोरा मार्ग एक्स्प्रेस हायवेवर पोहोचले. दरम्यान, शीतलसोबत गजभियेची वादावादी सुरूच होता. त्यानंतर एक्स्प्रेस हायवेवरील रस्त्यावर कार थांबविल्यानंतर शीतलने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे गजभिये बयाण दिले. शवविच्छेदन अहवालात मात्र तिचा मृत्यू डोक्याच्या आत मार लागल्याने झाल्याचे निष्पन्न होत आहे. तिची हत्या करून फेकण्यात आल्याचा संशय पोलिसांचा आहे. चौकशीदरम्यान त्याला पोलिसांनी घटनास्थळी नेले होते.आश्रय देणारा अटकेतसुनील गजभिये हा रविनगरातील घरी असताना १७ मार्च रोजी सकाळी त्याला गडचिरोली येथील बी अ‍ॅन्ड सीचा क्लर्क शिवदास गोंडाणे न्यायालयीन खटल्यासंदर्भात भेटण्यासाठी आला. त्यानंतर ते दोघे कारमध्ये बसून गडचिरोलीला गेले. तेथे गोंडाणे याने गजभियेच्या पत्नीच्या खात्यात चार लाख जमा केले. गजभियेला आश्रय दिल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. गजभियेच्या पत्नीच्या खात्याची चौकशी सुरू असल्याची माहिती ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली.रात्री दीडच्या सुमारास हत्या१३ मार्च रोजी सायंकाळी शीतल व गजभिये इर्विन चौकात दिसले. त्यानंतर शीतलच्या मोबाइलवर १०.२० वाजता आईचा कॉल आला. त्यानंतर मोबाइल बंद झाला. ११ वाजता शीतल, रहमान यांनी चांदुरबाजार रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर तिघेही अमरावतीच्या दिशेने निघाले. मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास शीतलची हत्या झाल्याची शक्यता गाडगेनगर पोलिसांनी वर्तविली आहे. मात्र, प्रवासादरम्यान काय झाले, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.न्यायालयाने गजभियेला २८ पर्यंत कोठडी सुनावली. शीतलने आत्महत्या केल्याचे गजभिये सांगत आहे. दुसरा आरोपी हाती लागल्यावर या हत्येचा उलगडा होऊ शकतो.- मनीष ठाकरेपोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणेगजभिये व शीतल यांच्यात वाद सुरू होते. मात्र, नेमके काय झाले, तिची हत्या कशी झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. चौकशीनंतर हत्येचा उलगडा होईल.- दत्तात्रय मंडलिकपोलीस आयुक्त.