शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

अपूर्ण कालव्यावर गावकऱ्यांचे अतिक्रमण

By admin | Updated: April 9, 2015 00:26 IST

मेळघाटचे दिवंगत नेते रामू पटेल यांच्या कारकिर्दीत मंजूर झालेले आणि त्यानंतर मुदतपूर्व तसेच कमी खर्चात तयार झालेले ..

समस्या : ३५ वर्षांपासूून शेतकऱ्यांची पाण्याकरिता पायपीटअरुण पटोकार  पथ्रोटमेळघाटचे दिवंगत नेते रामू पटेल यांच्या कारकिर्दीत मंजूर झालेले आणि त्यानंतर मुदतपूर्व तसेच कमी खर्चात तयार झालेले पहिले धरण म्हणजे शहानूर. या धरणाच्या लघुपाट क्र. १ पथ्रोट मायनरचे काम अद्याप अर्धवट स्थितीत आहे. स्थानिक बसस्थानकाच्या मागून जाणाऱ्या या कालव्यावर गावकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने ३५ वर्षांपासून कालव्याचे काम अपूर्ण आहे. शहानूर धरणाचे मुख्य कालवे पांढरी मायनर, खाडेगाव मायनर, जवळापूर मायनर, रामापूर मायनर हे कालवे धरण झाल्याबरोबर पूर्ण झाले. सध्या या कालव्यांवरील लाभार्थी शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मिळत आहे. त्यामुळे कालव्यावरील शेतकरी सुजलाम् सुफलाम् झाला आहे. मात्र, लघुपाट क्रमांक १ पथ्रोट मायनरचे काम मागील ३५ वर्षांपासून रखडले आहे. या कालव्याचे काम अपूर्ण असून गावकऱ्यांनी येथे अतिक्रमण केल्याने आता कालव्याचे काम करण्यास एडचणी येत आहेत. परिणामी शहानूर धरणाच्या पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकत नाही. या कालव्याचा सव्वा किलोमीटर लांब व ११ मीटर रूंद परिसर अतिक्रमणाने व्यापला आहे. त्यामुळे १९८१ पासून हा कालवा बंद अवस्थेत आहे. या कालव्याचे पाणी मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी अनेकदा शाखा अभियंता पेढेकर यांच्याकडे मागणी केली. मागणीच्या अनुषंगाने पेढेकर यांनी तहसीलदारांकडे पत्रव्यवहार केला. पत्र व्यवहारानुसार तहसीलदारांनी शाखा अभियंत्यांकडे पत्रही दिले. या अनुषंगाने कालव्याच्या दुरूस्तीकरिता अभियंत्यांनी अतिक्रमणधारकांना तेथून स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला. मात्र, अभियंत्याला धमकावून जेसीबी परत पाठविला. या व्यतिरिक्त १९८१ पासून खाडेगाव मायनर, पांढरी मायनर, पथ्रोट मायनर, रामापूर मायनरवर मुरूम नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अनेकदा मुरूम टाकून कालवा रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी रेटून धरली. मात्र, त्यावेळी निधी उपलब्ध नसल्याने कालवाा रस्ता दुरूस्तीचे काम रखडले. यंदा जलसंपदा विभागांतर्गत लघुपाट क्र. १ पथ्रोट, शेलगाव, ऐवजपूर, पांढरी मायनर, खाडेगाव मायनर, रामापूर मायनर वरच्या कालमव्यावर तेराव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीतून मुरूम टाकण्याचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पथ्रोट मायनरवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मागणीनुसार तहसीलदारांकडे पत्र दिले. तहसीलदारांनी आवश्यक तो पाठपुरावा करून कालव्यावरील अतिक्रमण हटविण्याचे पत्र दिले. त्यानुसार अतिक्रमणधारकांना हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी परत पाठविले.-डी.एन.पेढेकरशाखा अभियंता, शहानूर प्रकल्प.