शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथवर गॅरेजचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:35 IST

महापालिका क्षेत्रात रस्त्यावरील वाहतूक कोंडीने वाहनचालक, नागरिकांना नाहक त्रास होत असतानाच अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला थाटलेल्या गॅरेजमुळे या कोंडीत भरच पडली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून या गॅरेजवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथक व वाहतूक शाखेने संयुक्त कारवाई करून या समस्येचे तड लावावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमहापालिका निद्रिस्त : वाहतूक पोलिसांची कारवाईही ढिम्मच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात रस्त्यावरील वाहतूक कोंडीने वाहनचालक, नागरिकांना नाहक त्रास होत असतानाच अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला थाटलेल्या गॅरेजमुळे या कोंडीत भरच पडली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून या गॅरेजवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथक व वाहतूक शाखेने संयुक्त कारवाई करून या समस्येचे तड लावावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.महापालिका क्षेत्रात इर्विन चौक, बसस्थानक मार्ग, मोर्शी रोड, इर्विन ते रेल्वे स्टेशन रस्त्यासह पंचवटी व बडनेरा रस्त्यावर ठिकठिकाणी मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या जवळपास दुचाकी, चारचाकी दुरुस्तीची अनेक गॅरेजेस सुरू आहेत. यामुळे रस्ता व्यापून तसेच काही ठिकाणी पदपथांवरही अतिक्रमण केले जात आहे. येथे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गॅरेजचे काम सुरू असते. या गॅरेजमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने दुरुस्तीसाठी थांबत असल्याने जागा अडून राहते. दिवसभर वाहने उभी असतात. याआधीही नागरिक तसेच माजी नगरसेविका सुजाता झाडे यांनी या मुद्द्यांकडे पालिकेचे लक्ष वेधले होते. मात्र, तरीही महापालिका प्रशासनाने अशा रस्ता अडविणाऱ्या गॅरेजवर कारवाई केलेली नाही. वाहने दुरुस्त करताना आॅईल किंवा अन्य सामान रस्त्यावर टाकले जातात. रस्त्यांवर बेकायदा अतिक्रमण करणाºया तसेच अडथळा ठरणाºया गॅरेजवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.पालिकेच्या स्वच्छता आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून तीन वर्षांपूर्वी याबाबत मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, ही मोहीम काही दिवसांतच गुंडाळण्यात आली. त्यात रस्त्यावर अतिक्रमण करून अस्वच्छता करणाºया व रहदारीस अडथळा ठरणाºया गॅरेजचालकांना दंड ठोठावला होता. त्यावेळीही तोंडदेखल्या कारवाई करण्यात आली.आयुक्तांनी करावी कारवाईआता महापालिका आयुक्तांनी यात लक्ष घालून स्वच्छ अमरावतीच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर असलेल्या या गॅरेजेसवर आळा घालावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. तसेच, चित्रा चौक, रेल्वे स्टेशन मार्गावर जुन्या गाड्यांच्या विक्रीसाठीही रस्त्यांचा वापर होत आहे. गाड्यांचे विक्रेते जुनी वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून त्यावर 'फॉर सेल' असा बोर्ड लावतात. मालविय चौक ते चित्रा चौक या रूंद झालेल्या रस्त्यांच्या कडेला अशा जुने वाहन विक्रीसाठी उभे केल्याचे रोज दिसतात. यामुळे रस्ता अडवला जात आहे. असे चित्र शहरात अन्य ठिकाणीही दिसत असून, बेकायदा महापाालिकेच्या रस्त्यावर अतिक्रमण होत असूनही पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.शवागाराच्या पदपथावर अनधिकृत गॅरेजजिल्हा सामान्य रुग्णालयाकडूृन रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शवविच्छेदनगृहालगत चार ते पाच गॅरेज अनधिकृतपणे थाटण्यात आली आहे. पदपथावर राजरोसमणे हे अतिक्रमण थाटण्यात आले असून, अनेक दुचाकी तथा चारचाकी वाहने त्याठिकाणी असतात. छोट्या टपऱ्यांमध्ये गाडीदुरुस्तीचे साहित्य ठेवून येणाऱ्या वाहनांची दुरुस्ती खुलेआमपणे रस्त्यावरच केली जाते. या अतिक्रमणावर महापालिका यंत्रणेने सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. सोबतच इर्विनचौकातील परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीच्या पदपठावरसुद्धा अनधिकृतपणे गॅरेजेस चालतात.