शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांची मुजोरी !

By admin | Updated: November 12, 2016 00:19 IST

महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या दिशानिर्देशाने शहरात सर्वदूर अतिक्रमणावर गजराज फिरविला जात आहे; ...

महापालिकेला जुमानेनात : पोलिसांनी राखावा समन्वय अमरावती : महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या दिशानिर्देशाने शहरात सर्वदूर अतिक्रमणावर गजराज फिरविला जात आहे; तथापि अतिक्रमण निर्मूलन पथकाची पाठ फिरताच ते अतिक्रमण ‘जैसे थे’ होऊ लागले आहेत. दुसरीकडे सायंकाळनंतर या अतिक्रमणधारकांची मुजोरी वाढीस लागली आहे. श्याम चौकालतच्या नगर वाचनालयासमोरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढण्यास पालिका प्रमुखांना यश आले आहे. मात्र सायंकाळनंतर पुन्हा या ठिकाणी मिनाबाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. पार्किंगच्या व्यवस्थेच्या ठिकाणी पुन्हा सायंकाळपर्यंत हातगाड्या सजू लागल्या आहेत. आयुक्त पवार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच अतिक्रमण आणि पार्किंगचा प्रश्न हातात घेतला. त्यांच्या या प्रयत्नाला काहीअंशी यशही आले. मात्र त्याचवेळी फेरीवाल्यांनी पालिकेविरुद्ध उठाव केला. फेरीवाल्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या हॉकर्स झोनचा मुद्दा निकाली काढल्यानंतर फेरीवाल्यांसह अन्य अतिक्रमण उद्ध्वस्त करण्याला मर्यादा आल्या. दुपारच्या सुमारास जि.प. विश्रामगृहालगतच फुडझोन आणि वारंवार हातोडा टाकूनही येथे दुकाने थाटली जातात. त्यामुळे अशा मुजोरीला अटकाव करण्यासह सायंकाळनंतर थाटलेल्या अतिक्रमणावर गजराज फिरविण्याचे आव्हान महापालिकेला पेलायचे आहे. मध्यंतरी एक दोन दिवस सायंकाळनंतर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. मात्र त्यानंतर पुन्हा कारवाई झाल्याने अतिक्रमणधारक मुजोर झाले आहेत. (प्रतिनिधी)रस्त्यालगत अनधिकृत फूडझोन सायंकाळ ६ नंतर रस्त्यालगत फूडझोन साकारले जातात. यात बसडेपोकडून रुख्मिणीनगरकडे जाणारा मार्ग, काँग्रेसनगर रोड, नवाथे चौक, गाडगेनगर, राधानगर, उड्डाणपूल, पंचवटी, गांधी चौक, अंबादेवी मार्गाचा प्राधान्याने समावेश करावा लागेल. या अतिक्रमणाकडे वाहतूक शाखेने पुरेसे दुर्लक्ष केले आहे. वास्तविक वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांचीच आहे.