शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदारासमोरच लाच देण्यासाठी तक्रारदारास केले प्रोत्साहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:01 IST

अंजनगाव सुर्जीच्या ठाणेदारास पकडण्यासाठी अकोला एसीबी पथकाने २९ आॅगस्ट रोजी सापळा रचला. मात्र, अर्धवट कारवाईमुळे एसीबी पथकाला परत जावे लागले. त्यानंतर १२ दिवसांनी एसीबी पथकाने रायटरसह तीन खासगी व्यक्तींविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देअकोला एसीबीची कारवाई : रायटरने दिली ठाणेदाराला सापळ्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंजनगाव सुर्जीच्या ठाणेदारास पकडण्यासाठी अकोला एसीबी पथकाने २९ आॅगस्ट रोजी सापळा रचला. मात्र, अर्धवट कारवाईमुळे एसीबी पथकाला परत जावे लागले. त्यानंतर १२ दिवसांनी एसीबी पथकाने रायटरसह तीन खासगी व्यक्तींविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याबाबत अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात दिलेल्या एसीबीच्या फिर्यादीनुसार, ठाणेदार पाटील यांच्यासमोर त्यांच्याच कक्षात अब्दुल अजीज शेख याने तक्रारदारास लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले आहे.अकोला एसीबी पथकाने अंजनगाव सुर्जी येथील तक्रारदाराच्या लेखी तक्रारीवरून २९ आॅगस्ट रोजी पडताळणी सापळा रचला होता. प्रकरणातील दोन्ही खासगी आरोपी ठाणेदार पाटील यांच्याकडून कारवाई होऊ देणार नाही, याची हमी देत आधी दिलेल्या ३० हजारांव्यतिरिक्त उर्वरित रकमेसाठी तक्रारदाराशी वारंवार मोबाइलद्वारे संपर्क करीत होते. पंचांसमक्ष या दोेन खासगी इसमांची पडताळणी झाल्यानंतर ठाणेदार पाटील यांच्या पडताळणीसाठी ३० आॅगस्ट रोजी एसीबीने सापळा रचला. मात्र, ठाणेदार पाटील यांच्या कक्षात एसीबीचे तक्रारदारांसह गैरअर्जदार तिडके व अजीज यांच्यासमक्ष पडताळणी कारवाई करण्यात आली. दरम्यान, एसीबी तक्रारदाराविरुद्ध गुन्हे दाखल न करण्याविषयी बोलणी केली. यावेळी शेख अजीज यांनी एसीबी तक्रारदाराला लाचेची रक्कम पाटील यांना देण्यास त्यांच्यासमक्ष प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले. एकंदरीत एसीबीच्या तक्रारीतील गैरअर्जदार ठाणेदाराविरुद्ध एसीबी पथकाची पडताळणी सुरू असल्याचा संशय सागर शिवणकरला आला. तक्रारदाराची बंद खोलीत अंगझडती घेतली. तक्रारदाराच्या गळ्यात व्हॉइस रेकॉर्डर निदर्शनास आले. रायटरने ठाणेदाराच्या कक्षात जाऊन सापळा रचल्याची माहिती दिली. ही सर्व घटना एसीबीने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.तुला पाहून घेईन; ठाणेदाराची दमदाटीतक्रारदाराने एसीबी सापळा लावल्याचे ठाणेदाराला कळताच, त्यांनी तक्रारदारास मागील प्रकरणात तत्काळ अटक करून भादंविचे कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हे दाखल केले व त्याच्याजवळील तीन मोबाइलसुद्धा जप्त केले. तक्रारदाराकडे न्यायालयाचा अटकपूर्व जामीन असतानासुद्धा हातकडी लावली. त्यानंतर दोन कोऱ्या कागदांवर स्वाक्षरी घेऊन ठाण्यातून हाकलून दिले. तुला पाहून घेईन, अशी दमदाटीसुद्धा केल्याचे एसीबीच्या तक्रारीत नमूद आहे.ठाणेदारावर पोलीस विभागाकडून कारवाई नाहीठाणेदाराच्या कक्षात व त्यांच्यासमक्ष खासगी इसमाने तक्रारदारास लाच मागितल्याचे एसीबीच्या तक्रारीत स्पष्ट नमूद आहे. याशिवाय ‘तक्रारदारास पाहून घेईन’ असा उल्लेख असतानासुद्धा संबंधित ठाणेदारांविरूद्ध वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही, हे विशेष.आमचा तपास गोपनीय असून, यासंबंधी कारवाईचे अधिकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आहेत. अंजनगावच्या ठाणेदाराचा अहवाल त्यांना पाठविला जाईल.- श्रीकांत धिवरे, एसीबी पोलीस अधीक्षक, अमरावती